मुंबई : दिशा पटानीची गणना आता बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये होते. दिशा पटानीच्या सौंदर्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू असते. दिशा पटानी तिचा जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर घालवते. अलीकडेच अभिनेत्री दिशा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत आहे. दिशा पटानी अनेकदा हॉट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत असते. आज आम्‍ही तुम्‍हाला दिशा पटानीशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत, जो तुम्‍हाला क्वचितच माहीत असेल.. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण..



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकेकाळी जेव्हा दिशा पटानी बॉलिवूडमध्ये येण्यासाठी धडपडत होती. त्यावेळी तिचा प्रियकर टीव्ही अभिनेता पार्थ समथान होता. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. पण हे नाते काही काळ टिकले आणि लवकरच हे नाते तुटले. दिशा पटानी आणि तिचा बॉयफ्रेंड एका स्पर्धेत सहभागी झाला होता. याच दरम्यान दोघांची भेट झाली. दोघेही एकमेकांना डेट करू लागले.


दिशा पटानी आणि पार्थ यांचे अचानक ब्रेकअप झाले. एका मुलाखतीदरम्यान दिशाने सांगितले होते की, तिने पार्थला एकदा नव्हे तर दोनदा दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडले होते. यानंतर दिशाने हे नाते संपवले. दिशाने सांगितले की, ब्रेकअपनंतर ती आतून खूप दुखावली होती.