Disha Patani Boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिचा चित्रपटांपेक्षा व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे जास्त चर्चेत असते. मग तिचे बोल्ड फोटशूट असो, फिटनेस संबंधी व्हिडीओ असो किंवा तिची रिलेशनशिप स्टेटस अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ती सोशल मीडियावर वारंवार चर्चेचा विषय बनते. अलीकडेच, तिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यात ती तिचा प्रियकर म्हणून अलेक्झांडर म्हणून कोणाचा तरी उल्लेख करताना दिसते. टायगर श्रॉफसोबत तिच्या कथित ब्रेकअपनंतर, तिचे चाहते निराश झाले होते, परंतु अलेक्झांडरसोबतच्या तिच्या नातेसंबंधाबद्दल चर्चाना उधान आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशाने स्वत: या व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्या नव्या रिलेशशनशिप बद्दलचे सत्य उघड केले आहे. ज्यात ती एका हॉट रिवीलिंग ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. तिच्यासोबत एक व्यक्ती दिसत आहे जो अलेक्झांडर असल्याचे दिसते. ती तिथ असलेल्या लोकांना तो व्यक्ती तिचा बॉयफ्रेंड आहे असं सांगत ओळख करून देते. विशेष म्हणजे आहे की तिचा कथित एक्स बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ देखील या पार्टीत उपस्थित होता, परंतु तो दिशासोबत दिसला नाही. 



दिशा आणि टायगरच्या ब्रेकअपच्या अफवा काही काळापूर्वीच चर्चेत आल्या होत्या. ज्यामुळे त्यांचे चाहते निराश झाले होते. रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की दिशाचे टायगरवर एकतर्फी प्रेम होते आणि टायगर मात्र तिला फक्त एक मित्र मानत होता, जे खूपच आश्चर्यकारक होते. टायगरने सर्वत्र कबूल केले की दिशा फक्त त्याची मैत्रीण आहे. टायगरच्या तोंडून सत्य काढून घेण्यात करण जोहरलाही त्याचा 'कॉफी विथ करण' या शो मध्ये अपयश आले. शिवाय टायगरची बहीण आयशा श्रॉफ हिनेही टायगर आणि दिशा कधीच प्रेमसंबंधात नसल्याचे मान्य केले.


हेही वाचा : आईमुळे 2 वेळा शबाना आझमी यांनी केला होता स्वत: ला संपवण्याचा प्रयत्न, 'या' गोष्टीचा आला होता राग


दिशा पटानीच्या या नव्या रिलेशनशिप लवकरच सत्य उघड होईलच, मात्र आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचे तर, दिशा लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘योद्धा’ चित्रपटात दिसणार आहे. याव्यतिरिक्त, प्रभास अमिताभ बच्चन अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या बहुचर्चित 'कल्की 2898 एडी' या चित्रपटही ती झळकणार असलयाचे सांगितले जाते.