Disha Patani Crop Top: अभिनेत्री दिशा पटानी ही आपल्या बोल्ड लुकसाठी ओळखली जाते (Disha Patani Trolled) परंतु दिशा ही पारंपारिक वेशामध्येही प्रचंड सुंदर दिसते. वारासणी येथे झालेल्या गंगाआरतीला (Disha Patani Ganga Aarti Varanasi) अभिनेत्री दिशा पटानीनं हजेरी लावली होती. परंतु यावेळी तिच्या कपड्यांवरून मात्र दिशा पटानीला ट्रोल केलं आहे. क्रॉप टॉपवर शाल घेऊन आलेल्या दिशा पटानीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट अभिनेत्री म्हणून दिशाची चर्चा होताना दिसते. तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड लुकचीच सर्वत्र चर्चा होते. आता पुन्हा एकदा दिशा पटानी त्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा पटानी आपल्या फीटनेस आणि बोल्ड लुकसाठी कायमच ओळखली जाते. इन्टाग्रामनवरूनही ती आपल्या हॉटनेसची झलक दाखवतं असते. तिचे लुक्स हे (Disha Patani Instagram) कायमच चर्चेत असतात. त्यामुळे दिशा पटानी हे नावं इंटरनेटवर कायमच सोशल मीडियावरील सेन्सेशन म्हणून ओळखले जाते. दिशाचे अनेक बिकीनी लुकमधले फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तिच्या लेटेस्ट इन्टाग्रामवरील लुकही तिच्या चाहत्यांना अक्षरक्ष: घायाळ करून सोडलं आहे. सुपरहॉट अंदाजातील दिशा पटानी अनेकदा ट्रोलर्सच्याही निशाण्यावर आली आहे. आता पुन्हा ती ट्रोल झाली आहे. (disha patani get trolled after wearing crop top and shawl at ganga aarti in  varanasi)


दिशा पटानी पुन्हा ट्रोल


मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी तरी निदान चांगले आणि पारंपारिक कपडे घालू जावे अशी सूचना नेटकऱ्यांनी यावेळी दिशाला दिली. मिडिया रिपोर्ट्सनुसार, दिशा पटानी ही आपल्या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं वाराणसी येथे आहे. तिथं ती आपल्या नव्या चित्रपटाचे शुटिंग करते आहे. यावेळी दिशाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल करण्यात आले आहे. आपल्या तोकड्या कपड्यांवरून याधीही अनेकदा ट्रोल झालेल्या दिशाला आता नेटकरी एकच प्रश्न विचारत आहेत आता हिनं काय केलं? 


नेटकरी हैराण, चाहते शॉक 


नेटकऱ्यांनी यावेळी दिशाला प्रचंड ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपुर्वीच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या ओपनिंग सेरेमनीला अत्यंत रिविलिंग ब्लाऊज (Disha Patani at NMACC) आणि साडी घातल्यामुळे दिशा ट्रोल झाली होती आता परत एकदा दिशा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. 



सध्या दिशाचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत ज्यात दिशानं क्रॉप टॉप घातला आहे आणि ज्यात तिनं त्यावर शाल परिधान केली आहे व कपाळावर टीका लावला आहे आणि तिनं हातात काहीतकी घेतल्याचे दिसते आहे. त्यामुळे हे फोटो पाहताना अनेकांना संतापही अनावर झाला आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रियाही दिल्या आहेत.