मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. दिशा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्याच्या संपर्कात राहते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता दिशाचा एथनिक लूक समोर आला असून तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या लूकला तिनं वेस्टर्न टच दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत दिशा तिच्या गाडीतून उतरत असल्याचे दिसत आहे. दिशानं Sea Green रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. दिशाला त्या एथनिक ड्रेसमध्ये चालताना त्रास होत असल्याचे दिसत आहे. दिशाने यावेळी फ्लॅट मोजडी घातली आहे. त्यानंतरही तिला नीट चालता येत नाही आहे. त्यामुळे दिशा चर्चेत आली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दिशा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जॉन अब्राहमसोबत दिलेल्या बोल्ड सीन विषयी खुलासा केला आहे. यावेळी दिशाला प्रश्न विचारण्यात आला की, एका मुलीसाठी एक सीन शूट करणं किती कठीण असतं?  या प्रश्नावर उत्तर देत दिशा म्हणाली, 'मी कुणासोबत सीन करत होते? जॉन अब्राहम. ते सीन चित्रित करणं माझ्यासाठी फारसं अवघड गेलं नाही. मी पहिल्यांदाच यांच्यासोबत असे सीन चित्रित करत होती पण जॉनने आणि मोहित सरांनी माझी खूप काळजी घेतली. त्यांनी मला कम्फर्टेबल फील करून दिलं. खरं सांगायचं तर माझी काहीच तक्रार नाहीये.' असं म्हणतं दिशाने जॉनचं कौतुक केलं आहे. 


दिशा जेव्हा जेव्हा पड्यावर येते तेव्हा चाहते तिला पाहतच राहतात. दिशा तिचे लूक, ड्रेसिंग स्टाईल आणि तिच्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असते. दिशाच्या वर्कफ्रन्टबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूरसोबत 'एक विलेन रिटर्न्स' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा' चित्रपटात दिसणार आहे.