डेटिंगच्या चर्चांमध्येच Disha Patani नं नव्या बॉयफ्रेंडसोबत बाथरुममधील `तो` Video Viral
Disha Patani चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Disha Patani and Rumourd Boyfriend Aleksandar Alex Ilic Bathroom Video : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दिशा चाहत्यांच्या संपर्कात राहते. दिशा गेल्या काही दिवसांपासून टायगर श्रॉफसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. त्यानंतर आता दिशा तिचा मित्र अॅलेक्झॅन्डर अॅलेक्ससोबत (Aleksandar Alex) दिसली. त्या दोघांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, दिशानं अॅलेक्झॅन्डरसोबत बाथरुममधला जो व्हिडीओ शेअर केला तो पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.
दिशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. दिशा पटानीनं शेअर केलेल्या व्हिडीओत ते दोघे बाथरुममध्ये डान्स करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत दिशा आणि अॅलेक्झॅन्डर कॅमेऱ्यासमोर दिसत आहेत. तर बॅकग्राऊंडला एक गाण प्ले होत असून अॅलेक्झॅन्डर सतत त्याच्या हातानं हार्ट बनवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिशा आणि अॅलेक्झॅन्डर यांनी बाथरोब परिधान केले आहेत. तर दोघांनी डोक्यावर टॉवेल गुंडाळला आहे. दोघेही बाथरूममध्ये एकत्र नाचत आहेत आणि दिशा सुद्धा मध्येच ट्वर्क करत आहे. अॅलेक्झॅन्डर आणि दिशा यांनी शॅम्पूच्या बाटल्यांचा वापर माइक म्हणून केला आहे. अॅलेक्झॅन्डरसमोर दिशाचा हॉट डान्स पाहून चाहते हैराण झाले आहेत.
दिशासोबतच्या नात्यावर काय म्हणाला अॅलेक्झॅन्डर?
दरम्यान, एका मुलाखतीत अॅलेक्झॅन्डरला त्याच्या आणि दिशाच्या रिलेशनशिपविषयी विचारण्यात आलं होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यावर अॅलेक्झॅन्डर म्हणाला, 'लोक आमच्याबद्दल सखोल जाणून घेण्याचा आणि त्यावर त्यांना वाटेल ते अंदाज लावण्यात येत आहेत. अॅलेक्झॅन्डर म्हणाला, हे सगळं कसं चाललंय हे मी काही दिवसांपासून पाहत होतो. आम्हाला सत्य माहित आहे. मला समजत नाही की लोकांना हे सर्व करण्याची गरज का आहे? ते इतर लोकांना त्यांचे जीवन शांततेत का जगू देऊ शकत नाहीत? आम्ही यावर हसतो.'
हेही वाचा : कोण आहे 'गोपी बहू'चा पती? लग्न होताच त्याच्या मिठीत ढसाढसा रडू लागली अभिनेत्री
तो पुढे म्हणाला की, 'तो दिशाला त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये भेटला होता. ते दोघे फ्लॅटमेट होते.' अॅलेक्झॅन्डर या विषयी बोलताना म्हणाला, 'आम्ही 2015 मध्ये एकत्र राहत होतो. त्यावेळी दिशा आणि मी एकाच एजन्सीमध्ये होतो. दोघेही फिटनेसबाबत खूप पॅशनेट आहेत, त्यानंतर आम्ही एकत्र जिममध्ये जायला लागलो, त्यामुळे आमचं बाँडिंग खूप चांगले झालं.'
अॅलेक्झॅन्डरनं सांगितले की, दिशा ही त्याच्या कुटुंबासारखी आहे आणि जेव्हा जेव्हा दोघांनाही लो फील होते तेव्हा ते एकमेकांसोबत वेळ घालवतात. त्याने असेही सांगितले की तो टायगर श्रॉफच्या खूप जवळचा आहे आणि दिशाच्या ब्रेकअपबद्दल विचारले असता तो म्हणाला, 'मी इतर कोणत्याही गोष्टीवर भाष्य करणार नाही.' टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पटानी अनेकदा अॅलेक्झॅन्डरसोबत दिसली आहे. तेव्हापासून त्यांच्या रिलेशनच्या चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, अॅलेक्झॅन्डर हा गेल्या सात वर्षांपासून भारतात आहे.
काय करतो अॅलेक्झॅन्डर?
अॅलेक्झॅन्डर अॅलेक्स हा दिशा पटानीचा जिम ट्रेनर (Disha Patani Gym Trainer) आहे. 'गिरगिट' या वेबसीरिजमधून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याला हिंदी येत नव्हती तर त्यानं या वेबसीरिजसाठी ती भाषाही शिकली. दिशा नेहमीच अॅलेक्झॅन्डरसोबत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.