कोण आहे 'गोपी बहू'चा पती? लग्न होताच त्याच्या मिठीत ढसाढसा रडू लागली अभिनेत्री

लग्न करतचा पतीच्या मिठीत भावुक झाली गोपी बहू; देवोलीनाने 'या' व्यक्तीची जोडीदार म्हणून केली निवड...अखेर व्हिडीओ समोर  

Updated: Dec 15, 2022, 08:33 AM IST
कोण आहे 'गोपी बहू'चा पती? लग्न होताच त्याच्या मिठीत ढसाढसा रडू लागली अभिनेत्री  title=

Devoleena Bhattacharjee marriage : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या  लग्नाची चर्चा सुरु असताना साथ निभाना साथिया' (Saath Nibhaana Saathiya)  मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) ने मेहंदी, हळदीनंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल झाले. पण यावेळी देवोलीना खरंच विवाहबंधनात अडकली आहे का? असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला. 

यावेळी अभिनेत्री कोणत्या व्हिडीओ आणि प्रसिद्धसाठी लग्नाचे फोटो पोस्ट केले नाहीत, तर अभिनेत्रीने खरंच लग्न केलं आहे. अभिनेत्री देवोलीनाने जीम ट्रेनर शहनवाज शेखसोबत (shahnawaz sheikh) लग्न केलं आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

देवोलीना आणि  शहनवाज शेख (gym trainer shahnawaz sheikh) याचं अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री पतीच्या मिठीत भावुक होवून रडताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

देवोलीना आणि शहनवाज शेख यांचं प्रेम प्रकरण 

शहनवाज शेख एक जीम ट्रेनर आहे. बिग बॉस 13 दरम्यान देवोलीनाने सांगितलं होतं, ती घराबाहेरील एका व्यक्तीला डेट करत आहे. पण अभिनेत्रीने शहनवाज शेखचं नाव सांगितलं नव्हतं. देवोलीना आणि शहनवाज शेख यांची ओळख जीममध्ये झाली होती. 'साथ निभाना साथिया' मालिकेच्या सेटवर जेव्हा देवोलीनाचा अपघात झाला होता, तेव्हा शहनवाजने अभिनेत्रीची काळजी घेतली. तेव्हापासून दोघे एकत्र आहेत. 

दरम्यान, जेव्हा देवोलीनाने मेहंदी आणि हळदीचे फोटो पोस्ट केले, तेव्हा अभिनेत्री टीव्ही अभिनेता विशाल सिंहसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण जेव्हा देवोलीनाने पती शहनवाज शेखचे फोटो पोस्ट केले, तेव्हा सर्व सत्य समोर आलं.