मुंबई : अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) फक्त तिच्या बोल्ड आणि हॉट अदांमुळे नाही, तर फिटनेसमुळे चर्चेत असते. सध्या दिशा 'एक व्हिलन रिटर्न्स'मुळे चर्चेत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. एवढंच नाही तर दिशा सिनेमाचं दमदार प्रमोशन करत आहे. नुकताच  'एक व्हिलन रिटर्न्स' सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिशा एका कॉलेजमध्ये पोहोचली. जेव्हा दिशा कॉलेजमध्ये पोहोचली तेव्हा अभिनेत्रीची एक झलक पाहाण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच गर्दी जमली. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशाला पाहिल्यानंतर अभिनेत्रीसोबत सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुक होते.  तेव्हा दिशाने देखील चाहत्यांसोबत सेल्फी क्लिक केल्या. पण ऑफ शोल्डर आणि शॉर्ट ड्रेसमुळे दिशा सेल्फी घेणं कठीण झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. सध्या दिशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


दरम्यान, मोहित सुरी दिग्दर्शित 'एक व्हिलन रिटर्न्स' सिनेमाची सध्या तुफान चर्चा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे.  सिनेमात अभिनेता जॉन अब्राहम, अर्जुन कपूर अभिनेत्री तारा सुतारिया आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 सिनेमात दिशाच्या बोल्ड सीनमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. एवढंच नाही बोल्ड सीनसाठी दिशाने तगडी फी देखील घेतली आहे. सिनेमात दीशाने बोल्ड सीन दिले आहेत. ज्यामुळे नॅशनल क्रश दीशा पटानी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 


सिनेमात बोल्ड सीन देण्यासाठी अभिनेत्रीने 4 कोटी रुपये मानधन घेतलं असल्याचं समोर येत आहे. सिनेमामध्ये बोल्ड भूमिका देणारी दिशा सोशल मीडियावर देखील कायम चर्चेत असते. तिचे फोटो व्हिडीओ इंटरनेटवर कायम व्हायरल होत असतात.