मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी कायम आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. दिशा पटानी लवकर सलमान खानसोबत भारत या सिनेमात दिसणार आहे. आता दिशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले फोटो खूप चर्चेत आहेत. दिशा पाटनीने रेड बिकिनीतीर हे फोटो गुरूवारी पोस्ट केले आहेत. अगदी एका तासांतच हा फोटो 6 लाख लोकांनी लाइक केला. तसेच या फोटोंवर खूप कमेंट असून काहींनी यावर अपशब्द देखील लिहिले आहेत. 




दिशा पटानी काही दिवसांपूर्वी यशराज बॅनरचा सिनेमा नाकारल्यामुळे चर्चेत आली होती. दिशाने हृतिक रोशनमुळे तिने हा सिनेमा नाकारला होता. कारण हृतिकने दिशाशी flirt करण्याचा प्रयत्न केला. नंतर हे प्रकरण खोटं असल्याचं समोर आलं. दिशाचं नाव बॉलिवूडमधील अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडलं गेलं. हे दोघं अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांचे कायमसोबत फोटो असतात.