Disha Patani Look : अभिनेत्री (Disha Patani ) दिशा पटानी ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायमच अनेक फोटो चाहत्यांच्या भेटीला आणत असते. कमनीय बांधा आणि मादक अदा हे दिशाच्या सौंदर्याला जणू चार चाँद लावतात. सध्याही बी टाऊनची ही सौंदर्यवती तिच्या अशाच एका लूकमुळे प्रकाशझोतात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पटानी सतत एका व्यक्तीसोबत स्पॉट होत आहे. पार्टी असो किंवा फंक्शन, अभिनेत्री या व्यक्तीसोबत सहजते दिसते. अनेकदा दोघं एकत्र कधी सोबत जाताना दिसली. अभिनेत्रीचे फोटो समोर येताच दिशाचं नाव अफेअरच्या बातम्यांशी जोडलं जाऊ लागलं. या बातम्यांदरम्यान दिशा पटनीने सोशल मीडियावर एक बोल्ड सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये दिशा डीपनेक फ्लॉंट करताना दिसत आहे. अभिनेत्रीने हा सेल्फी शेअर करताच लोकांचं लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली.


डिपनेक ड्रेस परिधान केला
दिशा पटानीने इंस्टाग्राम स्टोरीवर पांढरा लेहेंगा चोली परिधान केलेला एक फोटो शेअर केला आहे या फोटोत ती आरशासमोर सेल्फी क्लिक करताना दिसत आहे. या फोटोमध्ये दिशा डीप नेक चोलीमध्ये दिसत आहे. डीपनेक ड्रेस परिधान करून तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे.


बोल्ड लूक व्हायरल 
या सूकला पुर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने तिचे केस मोकळे ठेवले आहेत.  यासोबतच अभिनेत्रीने लाइट मेकअपही केला आहे. त्याचबरोबर तिने तिच्या हातात बांगडी घातलेली दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीचा समोरुन चेहरा पूर्णपणे दिसत नसला तरी एक बाजू अभिनेत्रीची  नक्कीच दिसतेय.



ट्रेनरला करतेय डेट?
टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पटनी सतत एका माणसासोबत पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद होत आहे. या व्यक्तीचं दिशासोबतचं बाँडिंग फोटोंमध्ये स्पष्ट दिसत होतं. त्यानंतर या अभिनेत्रीचं नाव पुन्हा अफेअरच्या बातम्यांशी जोडलं जाऊ लागलं. बातमीनुसार, दिशा ज्या व्यक्तीसोबत दिसली त्याचं नाव अलेक्झांडर अॅलेक्स आहे जो एक जिम ट्रेनर आहे. तुम्हाला सांगतो, दिशा पटनीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर टायगर श्रॉफच्या अफेअरच्या बातम्या वेगाने येत आहेत. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर तो आकांक्षा शर्माला डेट करत आहे.