मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा फिटनेस जबरदस्त आहे. ही फिटनेस फ्रिक अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. सातत्याने फोटोज, व्हिडिओज ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फॅन फॉलोईंग तगडे लाहे. त्यामुळे तिने पोस्ट करताच तिचे फोटोज, व्हिडिओज व्हायरल होऊ लागतात. आता तिने इंस्टाग्रामवर व्हिडिओज शेअर केले आहेत. यात ती वेगवेगळे स्टंट्स करताना दिसत आहे. पाहा तिचे हे जबरदस्त स्टंट्स...





COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिकडेच तिने फ्रंट फ्लिप करुन एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले की, फ्रंट फ्लिप करण्याचा हा एक प्रयत्न. पाहा तुम्हाला कसा वाटतोय तिचा हा प्रयत्न...



या फिटनेस फ्रिक अभिनेत्रीचे नाव टायगर श्रॉफसोबत जोडले गेले आहे. हे दोघेही फिटनेस फ्रिक असून आता दिशा टायगरसारखे स्टंट्स करण्याच्या प्रयत्नात असल्याचे वाटते. असो... तरीही दोघांची स्ट्रेंथ, फिटनेस वाखाण्यासारखा आहे.