मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. बरेच लोक तिच्या फिटनेसचे चाहते आहेत आणि तिच्या चाहत्यांना खूष करण्यासाठी ती दररोज सुंदर फोटो शेअर करत असते.दिशा पटानीने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूप अॅट्रक्टिव्ह दिसत आहे. या फोटोत दिशा समुद्रकिनारी बिकिनीमध्ये दिसत आहे. हा फोटो तिच्या चाहत्यांसाठी भेटवस्तूपेक्षा कमी नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधीही दिशा पटानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये दिशा एका जाहिरातीचे शूट करताना दिसली. त्या काळात दिशा फक्त 19 वर्षांची होती. दिशाची जुने फोटो आणि व्हिडिओ बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. व्हिडिओपूर्वी तिच्या मॉडेलिंगच्या दिवसात साडी नेसलेली फोटोही व्हायरल झाले होते.



>


या चित्रपटात दिसली
दिशा पटानी सलमान खान सोबत 'राधे' या चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. लवकरच दिशा आणखी बऱ्याच चित्रपटात दिसणार आहे. दोन दिवसांपूर्वी दिशाने आपला वाढदिवस साजरा केला. टायगर श्रॉफने तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, जो खूप व्हायरल झाला होता.