मुंबई : अभिनेत्री दिशा पटानी तिच्या सोशल मिडियावरील फोटोजमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मिडियावर दिशाच्या फोटोंना चाहत्यांकडून नेहमीच चांगली पसंती मिळत असते. परंतु सध्या दिशा पटानी तिच्या बहिणीमुळे चर्चेत आहे. अगदी दिशा पटानी सारखीच नाजुक आणि सुंदर दिसणारी दिशाची बहिण भारतीय सैन्यात अधिकारी आहे. दिशाने तिच्या बहिणीचा वर्दीमधील एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दिशाने आपल्या इंन्स्टाग्रामवरुन बहिण खुशबूचा वर्दीतील फोटो शेअर केला आहे. त्यानंतर हा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याला मोठी पसंती मिळत आहे. याआधीही दिशाने बहिणीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. परंतु आता वर्दी फोटो शेअर केल्याने त्याची चांगलीच चर्चा आहे. दिशाची बहिण खुशबू तिची जवळची मैत्रिणही आहे. अनेक वेळा दिशाने बहिण खुशबूला तिची प्रेरणा मानत असल्याचं सांगितलं आहे. 





दिशा पटानी येत्या ५ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'भारत'मध्ये दिसणार आहे. तसेच दिशा दिग्दर्शित मोहित सूरीच्या आगामी 'मलंग' आणि 'बागी ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.