बिकीनी घालून दिशा पटानीचे अंडरवॉटर हेडस्टॅंड...
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीची भूरळ तरुणाईवर आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीची भूरळ तरुणाईवर आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली दिशा सातत्याने नवे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते. अलीकडेच तिने नवा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती अंडरवॉटर हेडस्टॅंड करताना दिसत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला. १ दिवसात या पोस्टला 27,43,366 व्यूज मिळाले आहेत.
बागी
२ मध्ये टायगर श्रॉफसोबत झळकल्यानंतर दिशा आता अधिक फिटनेस फ्रीक झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने जिम करतानाचा आणि सिक्स पॅक एब्सचा फोटो शेअर केला होता.
दिशा पटानी एथनिक, वेस्टर्न दोन्ही लूक्समध्ये खूप छान दिसते. सध्या तिचे टायगर श्रॉफची अफेअर असल्याच्या चर्चा आहेत. या जोडीला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली आहे. बागी २ मध्ये एकत्र झळकल्यानंतर दोघांचा नव्या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.