दिशा पटानीची लष्करातील बहिण अभिनेत्रींपेक्षा कमी नाही
दिशा आणि तिची बहिण चांगल्या मैत्रिणी देखील आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी कायम तिच्या फिटनेस, डान्स कौशल्यामुळे कायम चर्चेत असते. दिशाने अनेक चित्रपटांमध्ये भन्नाट भूमिका साकारत एक वेगळं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. दिशाची मोठी बहिण देखील तिच्यासारखीच फिटनेस फ्रिक आहे. दिशाच्या मोठ्या बहिणींचं नाव खुशबू पटानी असून ती भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणूनही देशाची सेवा करीत आहे. दिशाची ही मोठी बहिण तिच्या सारखीच सुंदर आहे. खुशबू तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर कायम तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.
दिशा आणि खुशबू फक्त बहिणी नाही तर चांगल्या मैत्रिणी देखील आहेत. काही दिवसांपूर्वी खुशबूने दिशासोबत मस्ती करताना आणि एक वर्कआऊट करताना व्हिडिओ शेअर केला होता. सध्या त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
दिशाची बहिण खुशबू बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. खुशबूची फॅन फॉलोइंग देखील दिशासारखाच आहे. स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती कायम तिच्या चाहत्यांना फिटनेससाठी प्रोत्साहित करत असते.