मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचे गूढ काळानुसार अधिकच गुंतागुंतीचे होत आहे. परंतु आपल्या हे देखील माहित आहे की, त्याच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी त्याची मॅनेजर दिशा सालियनने 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. तेने देखील ही आत्महत्या का केली या मागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु अनेकांकडून असा दावा केला जात आहे की, सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन या दोघांच्याही आत्महत्येचा एकमेकांशी संबंध आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांचा असा विश्वास आहे की, सुशांत सिंग राजपूत याची ही आत्महत्या नसून ती हत्या आहे, जी कोणत्यातरी कटाखाली झाली आहे. परंतु डॉक्टर सुशांत सिंग राजपूतहा एक डिप्रेशन रुग्ण होता असे सांगत आहेत, ज्यामुळे त्याने स्वत:च हे पाऊल उचलंलं असल्याचे सांगितले जात आहे.


दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने धक्कादायक वक्तव्य केले आहे. ज्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण आलं आहे.


या प्रत्यक्षदर्शीने दिशा सालियनवर मृत्यूपूर्वी बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. रात्री 9 ते 9.30 या वेळेत हा साक्षीदारही या पार्टीत उपस्थित होता. न्यूज नेशनशी बोलताना या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, '8 जून 2020 रोजी मालाडमध्ये पार्टी सुरू होती. पहिला एक तास पार्टी चांगली चालली होती. दरम्यान, दोघेजण बेडरूमच्या दिशेने गेले आणि त्यांनी खोलीला कडी लावली.'


या प्रत्यक्षदर्शीने पुढे सांगितले की, 'कोणालाही काहीही ऐकू येऊ नये म्हणून पार्टीत वाजत असलेल्या गाण्याचा आवाज खूप वाढला गेला होता. हे दोन्ही लोक मास्टर बेडरूममध्ये बंद होते. दिशा सालियनसोबत तिचा मंगेतर रोहन रायही तेथे उपस्थित होता. काही वेळाने हे लोक खोलीतून बाहेर आले. मला आश्चर्य वाटले की, इथे काय चालले आहे. मी जे पाहिले, ते मी तपास यंत्रणांनाही सांगू शकतो.'


या प्रत्यक्षदर्शीने पुढे दावा केला की, 'दिशा सालियनचा मृतदेह पाहून रोहन राय आणि त्याचा मित्र वांद्रे रेल्वे स्थानकाकडे धावले. याचा पुरावा रेल्वे पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्हीत नक्कीच सापडेल. दिशा सालियनच्या मृत्यूच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. अशा परिस्थितीत सुशांत सिंग राजपूतला या प्रकरणाच्या मुळाशी जायचे होते. दिशा सालियनच्या निधनाने त्याला खूप दुःख झाले.'


दिशा सालियनसोबत काय झाले हे सुशांतला जाणून घ्यायचे होते. दिशाच्या मृत्यूनंतर सुशांत सिंग राजपूतने त्याच्या मित्राला फोन करून दिशाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता असे देखील या प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.