मुंबई : ‘सब टीव्ही’वरील लोकप्रिय ठरलेली आणि गेले अनेक वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ त्यातील दयाबेन हे पात्र सगळ्यांचे लाडके. द्या ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी ही आपल्या अभिनयाच्या खास शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली. पण काही काळासाठी दिशा मालिकेत दिसणार नाही. नुकताच तिने मालिकेचा शेवटचा भाग चित्रित केला. आता ब्रेक घेण्याचे कारण तसे खास आहे. दिशा गरोदर असल्याने प्रसूती रजेवर जात आहे. त्यामुळे काही काळासाठी ती मालिकेत दिसणार नसल्याचे समजते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठ महिन्यांची गरोदर असलेल्या दिशाने १७ सप्टेंबर रोजी ‘तारक मेहता..’चा तिचा शेवटचा भाग चित्रीत केला. चित्रीकरणाच्या वेळी मालिकेची संपूर्ण टीम तिची खूप काळजी घेत होती. तसेच तिला त्रास होऊ नये यासाठी प्रॉडक्शन हाऊसकडून तिला सेटवर कमीत कमी वेळ थांबावे लागेल, यादृष्टीने तिच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले होते. त्याचबरोबर तिची काळजी घेण्यासाठी तिची सासू सतत तिच्यासोबत सेटवर असायची. 


दिशाने गेल्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये मयुर पांड्या याच्याशी विवाह केला. दिशाची अनुपस्थिती लक्षात घेता मालिकेच्या कथा लेखकांनीही पुढच्या भागांचे लेखन करण्यास सुरुवात केली आहे.