मुंबई : बॉलिवूडमध्ये आईच्या भूमिका अजरामर करणाऱ्या दिवंगत अभिनेत्री निरुपा रॉय यांची दोन मुलांत संपत्तीसाठी हाणामारी झाल्याचं समोर येतंय.


१०० करोडचा बंगला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निरुपा रॉय यांचं मुंबईतील नेपियन सी रोडवर एक जवळपास १०० करोड किंमतीचा बंगला आहे. हा बंगला रॉय यांनी १९६३ मध्ये १० लाखांहून कमी किंमतीला विकत घेतला होता. जवळपास ३००० स्क्वेअर फुटांवर हा बंगला बांधण्यात आला आहे. सोबतच फ्लॅटसोबत ८००० स्क्वेअर फुटांचा गार्डन एरियाही आहे. 


मुलांमध्ये वाद


निरुपा रॉय आणि त्यांचे पती कमल रॉय यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू आहेत. त्यांची मुलं किरण आणि योगेश यांच्यातलं भांडण इतक्या टोकाला गेलंय की हाणामारीनंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलाय.


कुटुंबियांना धक्काबुक्की


'मुंबई मिरर' या वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, रॉय यांचा छोटा मुलगा किरण (४५ वर्ष) यानं रात्री ११ वाजता कंट्रोल रुमला फोन करून आपला मोठा भाऊ योगेश नशेत घरात घुसून हाणामारी करत असल्याचं सांगितलं. किरणनं पत्नी किरण आणि मुलांसोबत आपण एका रुममध्ये स्वत:ला कोंडून घेतलं होतं. पत्नी आणि मुलांनाही योगेशनं धक्काबुक्की केल्याचं किरणचं म्हणणं आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 


दुसरकडे, ५७ वर्षीय योगेशच्या म्हणण्यानुसार, किरणनं मॅसेज पाठवून आपल्याला भडकावल्याचं म्हटलंय. 'किरणनं मुद्दाम अपार्टमेंटच्या सर्व लाईट सुरू ठेवल्या होत्या... तीन एसीही सुरू होते... कारण त्याला माहित आहे की हे बिल मला भरावं लागणार आहे' असं योगेशनं म्हटलंय.