Divita Rai : कर्नाटकच्या मंगलोरमध्ये राहणारी दिविता रायने (Divita Rai) कधी विचारही केला नसेल की, ती कधी मॉडेलिंग जगतात मोठं नाव कमावेल. दिविता रायचं नावं अचानक चर्चेत तेव्हा आलं जेव्हा मुंबईतून ती परदेशी प्रवास करू लागली. मात्र हा साधा-सुधा प्रवास नव्हता. दिविताचा हा प्रवास म्हणजेच मिस डीवा यूनिवर्सपासून (Miss Diva) ते मिस यूनिवर्स (Miss Universe) 2022 बनण्यापर्यंतचा आहे. दिविताने हा प्रवास कसा गाठला याकडे आपण नजर टाकूया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 वर्षांच्या दिविताचा जन्म कर्नाटकमध्ये झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती मुंबईमध्ये (Mumbai) आली. मुंबईतील जे.जे कॉलेजमधून तो आर्किटेक्चरचा अभ्यास केला. या काळात मॉडेलिंगमध्ये तिला रूची निर्माण झाली. अशा पद्धतीने तिची एन्ट्री पैजेंट वर्ल्डमध्ये झाली.


फेमिना मिस इंडियाचा प्रवास


2018 मध्ये दिविता रायने फेमिना मिस इंडिया ब्यूटी पॅजेंटमध्ये भार घेतला. ज्यामध्ये ती सेकंड रनर अप आली होती. दिविताला बास्क्टेबॉल आणि बॅटमिंटन खेळण्यासाठी खूप आवडतं. दिविता सुष्मिता सेनला इंस्पिरेशन मानते. तिच्या म्हणण्याप्रमाणे, सुष्मिता सेनने भारतात अनेक मुलींना मिस यूनिवर्सच्या मंचापर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न दाखवलं होतं.


हरनाजनंतर दिविता दुसरी मिस यूनिवर्स?


दिविताच्या कुटुंबामध्ये तिचे आई-बाबा आणि एक भाऊ आहे. नुकतचं ती मुंबई इंटरनेशनल एयरपोर्टवरून मिसीसिपीच्या एका शहरात न्यू ऑर्लिन्ससाठी रवाना झाली. या ठिकाणी ती 71व्या मिस यूनिवर्स ब्यूटी पॅजेंटमध्ये भाग घेणार आहे. जर दिविताने ही स्पर्धा जिंकली तर भारताला सलग दुसऱ्यावेळा अजून एक मिस युनिवर्स मिळणार आहे.