Divya Agarwal On Ex-Boyfriend Varun Sood's Khandani Jewellery : बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) विजेता दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) ही तिच्या कामापेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. दिव्यानं काही दिवसांपूर्वी तिचा खूप चांगला मित्र अपूर्व पाडगावकरसोबत (Apurva Padgaonkar) साखरपूडा केला. दरम्यान, त्या आधी दिव्या ही अभिनेता आणि रोडीज फेम वरुण सूदसोबत (Varun Sood) रिलेशनशिपमध्ये होती. इतकंच काय तर ते दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्या दोघांनी लवकरच लग्न बंधनात अडकण्याचा निर्णयही घेतला होता. त्या दोघांना आनंदी पाहून वरुणच्या कुटुंबानं दिव्याला त्यांचे खानदानी दागिने देखील दिले होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. आता वरुणच्या बहिणीनं दिव्याकडून त्यांचे हे खानदानी दागिने परत करण्यास सांगितले आहे. दरम्यान, दिव्या सतत वरुणच्या कुटुंबाला टोमणे मारताना दिसते. त्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता दिव्यानं या सगळ्यावर संताप व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरुणची बहिणी अक्षिता सूदनं दिव्याच्या ((Varun Sood Sister Akshita Sood) साखरपूड्याच्या जवळपास एका वर्षानंतर ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्यांचे खानदानी दागिने परत करण्यास सांगितले. तिनं दिव्याच्या मॅनेजरला ही सांगितले होते, परंतु त्यावर दिव्यानं किंवा तिच्या मॅनेजरनं प्रतिक्रिया दिली नव्हती. हे पाहता आता दिव्यानं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दिव्यानं तिच्या हातात दागिने असल्याचे दाखवले आहेत. हा फोटो शेअर करत दागिने परत करते असे म्हणतं हसण्याचे एक इमोजी देखील वापरले आहे. दिव्यानं शेअर केलेल्या या दागिन्यांच्या फोटोंमध्ये गणपतीचं पेन्डंट आणि कानातले दिसत आहेत. त्यासोबत तिनं आणखी एक ट्वीट केलं आहे आणि यावेळी तिच्या हातात किसचं चॉकलेट दिसत आहे. त्यासोबत दिव्यानं कॅप्शन दिलं की काही किस्सेससोबत...  




हेही वाचा : कार सेक्स ते रात्री विवस्त्र होऊन झोपणं... Shahid Kapoor च्या पत्नीनं केले होते धक्कादायक खुलासे




दिव्याचं हे ट्वीट पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. त्यावर उत्तर देत दिव्या म्हणाली की दागिने इतके महत्त्वाचे होते तर इतक्या दिवसांनी हे का लक्षात आलं. पुढे आणखी काही नेटकऱ्यांच्या ट्वीटवर दिव्यानं उत्तर दिलं आहे. एका नेटकऱ्याला उत्तर देत दिव्या म्हणाली की एका वर्षानंतर दागिण्यांची आठवण आली? मला जगू द्या, माझी मॅनेजर हॉस्पिटलमध्ये आहे. दुसऱ्या एका ट्रोलरला उत्तर देत दिव्या म्हणाली ती, 'मला आठवतही नाही. मी त्यांच्याकडून कधीच मागितले नाही. मी ते कधीच घातले पण नाही. आता एक वर्ष झाले आहे'.