मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री २-३ सिनेमांनंतर गायब होतात. हे सिनेमे फ्लॉप असतील तर यांना कुणी लक्षातही ठेवत नाही. तर काही अभिनेत्री सिनेजगतात चांगल नाव कमावून जातात. मात्र काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांना कामच मिळत नाही. दिव्या भारतीच्या बहिणीला देखील काम मिळत नाही आणि सध्या ती कामाच्या शोधात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


९० च्या दशकात सुपरहिट अभिनेत्री दिव्या भारतीचे अनेक चाहते होते. दीवाना या सिनेमानंतर दिव्या भारतीचे असंख्य चाहते झाले होते. तिचीच चुलत बहिण कियनात अरोरा असं या अभिनेत्रीचं नाव आहे. कियनात अरोर देखील दिव्या भारतीसारखी सुंदर दिसते. सध्या ती ३१ वर्षांची असून आताच्या अभिनेत्रींना देखील मागे टाकेल एवढी सुंदर आहे. कियनातने अरोराने १०० करोड केलेल्या 'ग्रँड मस्ती' या सिनेमांत काम केलं आहे. या सिनेमांत तिने मारलो हे कॅरेक्टर प्ले केलं आहे. तसेच कियनातने अक्षय कुमारच्या 'खट्टा मीठा' या सिनेमांत आयटम साँग 'आयला रे आयला' केलं आहे. 


कियनात पंजाबी सिनेमांमध्ये देखील काम करत आहे. तर आता ती तामिळच्या 'मनकथा' या सिनेमांत दिसली आहे. कायनातने मल्यालम, तेलगु आणि पंजाबी सिनेमांत देखील काम केलं आहे. लैला ओ लैला या सिनेमांत काम केलं आहे.