Divya Pugaonkar Talk About Divorced Women : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिव्या पुगावकर ही सतत चर्चेत असते. दिव्या छोट्या पडद्यावरील मुलगी झाली हो या मालिकेसाठी ओळखली जात होती. या मालिकेती दिव्यानं माऊ ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता दिव्याच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत दिव्या पुगावकर ही दिव्या आनंदीच्या भूमिकेत दिसत आहे. मालिकेत दिव्या एका घटस्फोटित महिलेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. आता दिव्यानं तिच्या या भूमिकेसाठी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिव्यानं ही मुलाखत ई-टाईम्सला दिली होती. या मुलाखतीत दिव्यानं तिच्या या घटस्फोटीत महिलेच्या भूमिकेवर तिचं मत मांडलं आहे. मालिकेतील घटस्फोटीत महिलेची भूमिकेविषयी बोलता दिव्या म्हणाली, 'या मालिकेत माझी भूमिका वेगळी आहे. मला ती भूमिका फार आवडतेय. कारण आनंदीला देखील स्वतःचं मत आहे, जसे मला आहे. पण मला या पात्रासाठी खरंच मनाची तयारी करावी लागली. मी पहिल्यांदाच अशी भूमिका साकारते. त्यामुळेच माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. आपल्याकडे घटस्फोटीत मुली किंवा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो. प्रत्येकाच्या मनात घटस्फोटीत महिलेविषयी वेगळे दृष्टीकोन असतात. पण मला असं वाटतं की लोकांनी घटस्फोटीत मुलींकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन हा बदलायला हवा. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की एखादी स्त्री जर घटस्फोटीत असेल तर तिनं तिच्या भूतकाळात नक्कीच काही चुकीचं केलं असणार. हेच खरं वाईट आहे, हे कुठेतरी थांबायला हवं.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


घटस्फोटीत हा टॅग काढून टाकायला हवा असं म्हणतं दिव्या पुढे म्हणाली, 'घटस्फोटामुळे पती-पत्नी दोघांवरही परिणाम होतो. कारण घटस्फोटासाठी कधीही एक व्यक्ती जबाबदार नसते किंवा फक्त स्त्रियाच घटस्फोटाला जबाबदार नसतात. ‘घटस्फोटीत’ हा टॅग काढून टाकता आला पाहिजे. घटस्फोटीत महिलेलाही तिचं आयुष्य स्वातंत्र्यपणे जगता आलं पाहिजे. तिला तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्याचा अधिकार आहे.'


हेही वाचा : समस्त पतीदेवांनी वाचाच; मेहुणी- पत्नीच्या वाढदिवसांच्या तारखांमुळे Milind Gawali वर आली ही वेळ, आता म्हणतो...


दिव्या पुढे म्हणाली, 'घटस्फोटीत स्त्रीचं आयुष्य कसं असतं तिच्या आयुष्यात किती दु: ख असतात आणि या सगळ्याचा ती कसा सामना करते? हे दाखवण्यात येणार आहे. आता या मालिकेतून घटस्फोटीत महिलेकडे पाहण्याचा लोकांना दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मला खात्री आहे की हा शो पाहिल्यानंतर घटस्फोटीत महिलेबद्दलची प्रत्येकाची मानसिकता बदलेल. घटस्फोटाबाबत तिनं मांडलेलं मत पाहता एका नव्या पिढीचे विचार तिच्यामुळं समोर आले. अर्थात हे तिचं वैयक्तिक मत आहे. सध्या तिचं हे वक्तव्य चर्चेत आलं असून, त्यात गैर काय? असाही प्रश्न अनेकजण विचारत आहेत.