मुंबई : 'बाहुबली'मध्ये कटप्पाची भूमिका निभावणाऱ्या अभिनेते सत्यराज यांची तुम्हाला ओळख झालीच असेल.... परंतु, कटप्पा यांच्या मुलीबद्दल तुम्हाला माहीत आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्यराज यांच्या सुंदर मुलीचं नाव आहे दिव्या... दिव्या फिल्मी दुनियेच्या झगमगटापासून दूर राहणंच पसंत करते... हॉट लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. दिव्या व्यवसायानं एक न्युट्रिअॅलिस्ट असून लोकांना खाण-पानासंबंधी सल्ला देत असते. गेल्या सात वर्षांपासून दिव्या न्युट्रिअॅलिस्ट म्हणून काम करतेय... चेन्नईतील दोन क्लिनिकमध्ये ती सध्या लोकांना सल्ला देण्याचं काम करते. सध्या ती 'न्यूट्रिशन'मध्ये पीएचडीही पूर्ण करतेय. 


दिव्या आणि सत्यराज 

उल्लेखनीय म्हणजे, दिव्याचा भाऊ आणि सत्यराज यांचा मुलगा सिबि हादेखील एक तमिळ अभिनेता आहे. सुंदर दिव्यानंही सिनेक्षेत्रात यावं, अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे... सोशल मीडियावर अशा प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आपला सिनेमात काम करण्याचा कोणताही मानस नसल्याचं दिव्यानं आधीच स्पष्ट केलंय. परंतु, आपल्याला सिनेमे पाहण्याची आवड आहे, असं सांगायला ती विसरत नाही. 


दिव्या सत्यराज

पंतप्रधानांना पत्र 


याआधीही दिव्या, पंतप्रधानांना लिहिलेल्या एका पत्रामुळे चर्चेत आली होती. काही फार्मा कंपन्यांविरोधात पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं तिनं या पत्रात म्हटलं होतं. काही यूएल फार्मा कंपन्या आपलं प्रोडक्ट प्रिस्क्राईब करण्यासाठी आपल्यावर दवाब टाकण्याचा प्रयत्न करत आहेत... याला विरोध दर्शवल्यानंतर या कंपन्यांनी आपल्या राजकीय दबावाचाही वापर केला... परंतु, या औषधांमुळे डोळ्यांना इजा होण्यासोबतच जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आपण ही औषधं घेण्याचा सल्ला कुणालाही देणार नाही, असं दिव्यानं म्हटलं होतं.