मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी 'ये हे मोहब्बते' तून घराघरात पोहोचली आहे.  आपल्या अभिनयासोबतच कधी फॅन्ससोबत एलियन डान्स तर कधी डबस्मॅश करुन ती सर्वांच मनोरंजन करतेय. पण तिचा नवऱ्यासोबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलाय.  नवऱ्याच्या वागणूकीवर कंटाळलेल्या दिव्यांकाने आपल्या नवऱ्याला चांगलाच धडा शिकवल्याचे या व्हिडिओमध्ये दिसतेय.


दिव्यांका भडकली आणि...



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंस्टाग्रामवर शेयर केलेल्या या व्हिडिओत दिव्यांका आपला पती विवेकसोबत बेडरूममध्ये टीव्ही पाहताना दिसतेय. पण विवेक आपल्या फोनमध्ये इतका बिझी आहे की दिव्यांकाला त्याला स्नॅक्स भरवायला लागत आहे.पण अस करता करता दिव्यांका कंटाळून जाते आणि विवेकला धडा शिकवायचे ठरवते. पोटॅटो फिंगर ऐवजी दिव्यांका विवेकला तिखट मिर्ची भरवते. आपल्या मोबाईलमध्ये बिझी असलेल्या विवेकने मिर्ची खाल्यावर त्याचा चेहरा लाल होतो.


व्हिडिओ व्हायरल 


'माझा नवरा मोबाईल सोडत नाहीए..हा प्रॅंक त्याला धडा शिकवण्यासाठी..' असे कॅप्शन दिव्यांकाने या व्हिडियोला दिलय.  .#CouplePrankChallenge' असे हॅशटॅग देऊन ते शेयरही केलय. गेल्या २० तासात हा व्हिडिओ ९ लाख २० हजाराहून अधिकजणांनी पाहिला.