या कलाकारांकडून दिवाळीच्या शुभेच्छा
कोण आहेत हे कलाकार
मुंबई : सगळीकडे दिवाळीचा उत्साह आहे. रोशनाईने सजलेला हा सण प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. दिवाळीच्या प्रत्येकाच्या अशा खास आठवणी असतात. झी मराठीवरील मालिकेतील प्रत्येक कलाकार आज प्रेक्षकांना आपलासा वाटतो. या कलाकारांनी आपल्या प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सिद्धार्थ बोडके, अभिनेता (तू अशी जवळी राहा - झी युवा)
दिवाळी हा माझा आवडता सण आहे आणि हा सण मी माझ्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत साजरा करतो. दिवाळी हा सण नेहमीच खूप खासअसतो. हा दिव्यांचा सण सगळ्यांच्या आयुष्यातील निराशेचा अंधार दूर करत एक नवीन आशेची किरण घेऊन येतो. मी सुप्रीम कोर्टने फटाके फोडण्यासाठी दिलेल्या निश्चित वेळेच्या निर्णयाला सपोर्ट करतो. हा खूप चांगलानिर्णय आहे, त्यामुळे एका अर्थी ध्वनी आणि वायू प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल. माझ्याकडून माझ्या सर्व चाहत्यांना आणि प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
तितिक्षा तावडे, अभिनेत्री (तू अशी जवळी राहा - झी युवा)
“माझ्यासाठी दिवाळी म्हणजे भरपूर खरेदी, लक्ष्मीपूजन, मिठाया आणि गोड पदार्थ बनविणे आणि आपल्या जवळच्या नातलगांबरोबर दिवस घालविणे. दरवर्षी मी दिवाळीत माझं घर विविध प्रकारचे दिवे आणि रांगोळीनेसजविते. दिवाळी हा सण कुटुंबीय आणि मित्रमंडळींसमवेत साजरा करायचा असतो. यंदा दिवाळीत मी एका अनाथालयाला भेट देऊन तिथल्या मुलंबरोबर काही काळ व्यतीत करणार आहे. त्यांना मी विविध मिठाया आणिचॉकोलेट वाटणार आहे. यंदाच्या दिवळीत आनंद आणि प्रेम वाटा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!”
हृता दुर्गुळे, अभिनेत्री (फुलपाखरू - झी युवा)
“दिवाळी हा सर्वांत आवडता सण असून तो देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या काळात आपला परिसर दिव्यांच्या प्रकाशामुळे इतका उजळून जातो की ते पाहून डोळे दिपून जातात. मला दिवे आवडतात; पण मीध्वनी आणि हवेच्या प्रदूषणाच्या कठोर विरोधात आहे. आपण सर्वांनीच जबाबदार नागरिक बनलं पाहिजे आणि दर सण-उत्सवांची संधी साधून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फटाके उडवून वायू आणि ध्वनीप्रदूषण करणं सर्वांनी थांबवावं आणि पर्यावरणरक्षणाचं काम करावं, असं मी सर्वांना आवाहन करते. सर्वांना ही दिवाळी आनंदची आणि भरभरटीची जावो, हीच शुभेच्छा!”
खुशबू तावडे, अभिनेत्री (आम्ही दोघी - झी युवा)
दिवाळी हा दिव्यांचा आणि रंगांचा उत्सव असून तो आपल्यासोबत खूप आशा आणि आनंदाची भावना घेऊन येतो. ही माझी आणि संग्रामाची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे. या दिवसांत मला रांगोळी काढायला आणि विविध मिठाया खायला खूप आवडतं. यावेळी मला माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी घेता येतात आणि नातेवाईक आणि कुटुंबियांसमवेत एकत्र राहण्याची संधी मिळते. फटाके उडविण्याच्या मी विरोधात असून लोकांनी मेणबत्त्या, पणत्या, दिव्यंनी घर उजळवून टाकावं आणि आपल्या कुटुंबियांसह मजेत वेळ घालवावा. आपण पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे आणि त्यला बाधा आणणाय्रा कृती टाळल्या पाहिजेत.”
सुयश टिळक, अभिनेता (बापमाणूस - झी युवा)
दिवाळी म्हणजे चांगल्या पदार्थांची चंगळ आणि चांगल्या लोकांची संगत. दिवाळीमध्ये खूप फटाके फोडले जातात. फटाके फोडण्याची मजा क्षणिक आहे पण ते पर्यावरणाला खूप अपायकारक आहेत. प्राण्यांना फटाक्यांच्या आवाज आणि धुराचा खूप त्रास होतो. पर्यावरण हे सगळ्यांसाठी आहे त्यामुळे पर्यावरणावर प्राण्याचादेखील तितकाच हक्क आहे. आपण पर्यावरण दूषित करून त्यांना त्रास नाही देऊ शकत. तसेच आकाशात सोडणारे कंदील देखील वापरू नयेत त्याने देखील खूप प्रदूषण होतं. मी सगळ्यांना इकोफ्रेंडली दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करतो. यावर्षी दिवाळी दिव्यांनी साजरी करून प्रदूषणाचा अंधार दूर करूया.