diwali 20222: दिन दिन दिवाळी..पण फरशीवर लोळतोय saif-kareena चा लेक `जेह बाबा` !
दिवाळी सण सर्वांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा सण लहान थोरांपासून सर्वानाच दिवाळी सणाचं फार अप्रूप असत.. घरोघरी फराळ बनतो नातेवाईक आप्तेष्ट मंडळी भेटायला येतात,
diwali 2022: दिवाळी सण सर्वांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा सण लहान थोरांपासून सर्वानाच दिवाळी सणाचं फार अप्रूप असत.. घरोघरी फराळ बनतो नातेवाईक आप्तेष्ट मंडळी भेटायला येतात, एकत्र फराळ असो किंवा मग स्नेहभोजन असो सर्व काही आनंदी वातावरण असत सगळीकडे एक वेगळ्या प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो .
वसुबारसच्या दिवशी दिवाळी सणाला सुरवात होते त्यांनतर धनतेरस असते या दिवशी धनाची पूजा केली जाते,यांनतर येतो तो दिवस लक्ष्मीपूजनाच्या .या दिवशी घरी देवी लक्ष्मीची आणि श्री गणेशाची पूजा करतात. वर्षभर आणि सतत आपल्या घरी देवी लक्ष्मीने वास करावा आपल्या घरी सुख समृद्धी नांदावी म्हणून देवीची पूजा अर्चना केली जाते , आपल्याला सर्व प्रकारच्या समस्यांपासून दूर ठेवण्यात यावं यासाठी विघनहर्त श्री गणेशाची आराधना केली जाते.
बॉलीवूड मध्ये दिवाळी पार्टीचा बोलबालाच आहे. कलाकाराच्या घरी दिवाळी पार्टीच आयोजन केलेलं असत त्याला सर्व कलाकार मंडळी हजेरी लावतात. सर्वांचा यावेळी अंदाज हा वेगळाच असतो अतिशय सुंदर स्टाईल स्टेटमेंट देत हे कलाकार मंडळी पार्टीला हजेरी लावतात.
नुकतंच सर्वानी दिवाळी लक्ष्मीपूजन केलं त्याचे फोटो आता समोर येऊ लागले आहेत. करीना कपूरने सुद्धा पती सैफ आणि तैमूर, जेहसोबतचे फोटो अपलोड केले आहेत. यावेळी एक फोटोने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलय. (diwali 2022: saif kareena kapoor son jeh baba laying on floor this diwali cute photo viral on social media)
family फोटो काढत असताना करीना सैफचा लेक जहांगीर म्हणजेच जेह बाबा जमिनीवर लोळू लागला आणि हा फोटो सुद्धा खेचण्यात आला सध्या सगळीकडे याच फोटोची चर्चा होतेय यात सर्व फॅमिली क्युट पोझ मध्ये दिसून येत आहेत दिवाळीनिमित्त सर्व छान तयार झाले आहेत.या फोटोवर सध्या कॉमेंट्स येऊ लागल्या आहेत. क्युट जेहच सर्वजण कौतुक करत आहेत.