मुंबई : टीव्हीचा लोकप्रिय शो 'दिया और बाती हम'ने अनेक वर्षांपासून लोकांच्या मनावर राज्य केले आहे. या शोमधील संध्या बिंदानीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका सिंग सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका सिंग अभिनयासोबतच उत्तम डान्सर देखील आहे. ती दररोज तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.


पण नुकताच तिने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे ती खूप ट्रोल होत आहे. ती डाम्स करत असताना जोरदार हवा आल्याने तिचा ड्रेस उडाला, त्यामुळे ती oops moment ची शिकार ठरली आहे. हा व्हिडिओ खरं तर खूप जुना आहे. जो सध्या व्हायरल होत आहे.


या व्हिडिओमध्ये ती 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटातील 'बन के तितली दिल उडा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. पण आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की डान्स करताना तिचा शॉर्ट ड्रेस हवा आल्यामुळे उडतो आणि ती कसं बसं स्वत:ला सावरते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पिवळा फ्रॉक परिधान करून ती डोंगराच्या मधोमध डान्स करताना दिसत आहे. डान्स करताना तिचा फ्रॉक वाऱ्याने उडतो आणि संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद होतो. मात्र, दुसऱ्याच क्षणी ती आपला ड्रेस सावरते आणि पुन्हा डान्स सुरुवात केली.


हटके स्टाईल करण्याच्या नादात अनेक अभिनेत्री oops moment ची शिकार होतात.