मुंबई : आपल्या जीवनात रंग ज्या प्रकारे महत्वाची भूमिका बजावतात त्याचप्रमाणे रंग चित्रपटांमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मग ते जीवन असो वा चित्रपट, सिनेमात रंग किती महत्वाचे आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोड्या फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. 1913मध्ये 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट रिलीज झाला. तेव्हा लोकांनी हा सिनेमा खूप आनंदाने पाहिला. हा भारतातील पहिला चित्रपट होता, म्हणून हा सिनेमा पाहण्यासाठी लोक उत्साही होते. त्यानंतर तो सिनेमा आला ज्याने सिनेमाला आवाज दिला म्हणजेच टॉकी सिनेमा बनवला गेला. 1931 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट 'आलम आरा' होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तयार झाला होता. हा तो काळ होता, जेव्हा लोकं ब्लॅक अँण्ड व्हाईट चित्रपट उत्सुकतेने पहायचे. मात्र, त्या काळातल्या चित्रपट निर्मात्यांनादेखील ब्लॅक अँण्ड व्हाईट चित्रपटातही रंगासाठी राखाडी शेड्स कसा वापरायचा, हे चांगलं माहित होतं. त्या चित्रपटांमध्ये ग्रे शेड्स चमकदारपणे वापरला जात असंत.


जाणून घ्या भारताचा पहिला रंगीत चित्रपट कोणता आहे
सायलेंट आणि टॉकीज चित्रपटानंतर तो काळ आला, जेव्हा भारताचा पहिला रंगीत चित्रपट तयार झाला. तुम्हाला माहिती आहे का भारताचा पहिला रंगीत चित्रपट कोणता होता?  1937 मध्ये मोती जी गिडवाणी यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला.


'किसान कन्या' असं या चित्रपटाचं नाव होतं. या चित्रपटाद्वारे भारतीय सिनेमाला रंग प्राप्त झाला आणि अर्देशिर इराणी निर्मित हा चित्रपट भारतातील इतिहासाचा पहिला रंगीत चित्रपट ठरला.


इतिहास रचण्यात चुकले व्ही. शांताराम
मात्र, प्रख्यात चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांचा चित्रपट 'शिरंद्री' या सिनेमाला रंग देण्यास काहीच अडचण नसती, तर आज हा चित्रपट भारताचा पहिला रंगीत चित्रपट ठरला असता.


खरं तर, व्ही. शांताराम यांनी १९३३ मध्ये रिलीज झालेल्या 'शिरेंद्री' चित्रपटात रंग घेण्याचे अनेक धोके घेतले आणि ते जर्मनीला घेऊन गेले. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि चित्रपटात रंगत येण्याची कल्पना फारच अयशस्वी झाली आणि व्ही. शांताराम इतिहास रचण्यात चुकले.