मुंबई : झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी केली. सिद्धार्थने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन स्वत:च्या आता पर्यंतच्या प्रवासाचे किस्से रंगवले आहेत. लहानपणापासूनच सिनेमाची आवड असल्याचे त्यानी सांगितले आहे आणि त्याच्या या आवडीला त्याच्या वडीलांनी दुजोरा दिला. लहानपणी त्याचे वडील त्याला दर शूक्रवारी सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी नेत असत. तो टेपवर सलमान खानची गाणी ऐकत मोठा झाला आणि त्याच्याकडे शाहरूखसारखा 'कूल' लॉकेट होता. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


सिद्धार्थचे वडील सीए आहेत आणि भविष्यात त्याने सीएला प्राधान्य देण्याचे ठरवले. नंतर महाविद्यालयात असताना त्याने नाटकांच्या माध्यमातून अभिनयास सुरूवात केली आणि ऑडिशन देण्यास सुरूवात केली. सुरवातीला त्याने अनेक खस्ते खाल्ले पण त्याच्य वडीलांनी कायम त्याला पाठींबा दिला अॅमेझॅन प्राईमच्या एका सीरिच्या माध्यमातून त्याच्या करिअरला पंख मिळाले. 


एका पार्टीमध्ये दिग्दर्शक झोया अख्तरला भेटल्यानंतर त्याच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. पार्टीमध्ये त्यांनी 'गल्ला गु़डीया' गाण्यावर एकत्र डान्स केला. झोयाने त्याला 'गली बॉय' सिनेमाच्या ऑडिशनसाठी बोलवले आणि त्याचे आयुष्य नेहमी साठी बदलले. 


 



'गली बॉय' सिनेमा प्रदर्शनानंतर चक्क बॉलिवूडच्या बिग बी अमिताभ बच्चन यांनी सिद्धार्थला एक पत्र लिहले. सिद्धार्थने ते पत्र त्याच्या वडीलांच्या स्वाधीन केले. त्याचे वडील बच्चन यांचे मोठे चाहते आहेत. माझे वडील हे माझे खरे एमसी शेर असल्याचे त्यानी सांगितले.