मुंबई : दररोज अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक फोटो खूप वेगाने व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन मुलं या फोटोत दिसत अनेकांना हा फोटो पाहून प्रश्न पडत आहे की ही मुलं नक्की आहेत तरी कोण? काहींना लक्षात आलं आहे की ही मुलं नक्की कोण आहेत, त्यांनी कमेंटमध्ये आपले उत्तर लिहिले आहे.


फोटोमध्ये असलेली ही दोन मुलं एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. आणि दोघांची तुलना भारतातील श्रींमत व्यक्तींमध्ये केली जाते. दोघेही देशातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत.


या इतक्या माहिती वरुन अनेकांना अंदाज आला असेलच की ही बालपणीचे फोटो कोणाचे आहेत.



हा फोटो देशातील प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयनका यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनही लिहिलं आहे. कॅप्शनमध्ये ते लिहितात- दोन प्रसिद्ध भाऊ. हिंट म्हणून सांगतो M आणि A...


हे फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोवर अनेक प्रतिक्रियाही देखील येत आहेत. हा उद्योगपती मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांचा लहानपणीचा फोटो आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.