मुंबई : माणूस आहे, चुकणारच... असं म्हणत अनेकदा काही लहानमोठ्या चुका अगदी सर्रासपणे पोटात घातल्या जातात. पण, कित्येकदा याच चुकांकडे केलेल्या दुर्लक्षामुळं एखादा असा प्रसंग ओढावतो, जेव्हा घडलेला गुन्हा डोकं भणभणून सोडतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अशाच गुन्हासाठी एक लोकप्रिय अभिनेत्री आणि तिच्या पतीला 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 


'डॉक्टर स्ट्रेंज' फेम अभिनेत्री जारा फायथियन आणि पती विक्टर मार्क यांच्यावर लावण्यात आलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणांवरील आरोपांनंतर त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. (Doctor strange fame actress zara fithian and husband gets jail for child sexual abuse )


नॉटिंघम क्राऊन कोर्टात जारावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर तिला ही शिक्षा सुनावण्यात आली. जारा आणि तिचा पती विक्टर या दोघांवरही आणखी एका मुलीचं शोषण करण्याचेही गंभीर आरोप आहेत. याप्रकरणी 14 वर्षांच्या कारावासाचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 


आरोप सिद्ध झाल्यानंतर ही दोघंही आता सेक्शुअल क्रिमिनल रजिस्टरवर स्वाक्षरी करतील आणि यानंतर त्यांना कधीच लहान मुलांसोबत काम करण्याची परवानगी नसेल. 



2005 ते 2008 पर्यंत अत्याचार 


जारा आणि तिचा पती विक्टर या दोघांनीही 2005 ते 2008 दरम्यान या मुलीचं लैंगिक शोषण केलं. 'डेयर' गेम खेळण्याच्या बहाण्यानं त्यांनी तिच्याशी असभ्य वर्तन केलं. पीडितेनं आता आक्रोश करत, 'तुम्ही माझी निरागसताच हिणावली, माझा नायनाट केला... मला कोणत्याही नात्यासाठी पात्र ठेवलं नाही' अशा शब्दांत संताप व्यक्त केला. 


सदर प्रकरणीच्या सुनावणीसाठी ही नराधम जोडी एकत्रच न्यायालयात आली. यावेळी विक्टर पब्लिक गॅलरीमध्ये असणाऱी गर्दी पाहून रडू लागला. तर, अभिनेत्री तिथं एकाच जागी शांत बसली. या दोघांनी गेलेला हा गुन्हा 'प्री-प्लांड' असल्याचा निष्कर्ष न्यायाधीशांनी सुनावला.