Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. जान्हवी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. जान्हवीचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत फोटोशूट आधी तिनं IV ड्रिप लावल्याचे दिसत आहे. त्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवीनं नुकतंच एक साडीचं फोटोशूट केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिनं यावेळी विना ब्लाउज साडी नेसली आहे. हा व्हिडीओ हेअर आर्टिस्ट अमित ठाकुरनं सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओत त्यानं एका शूटच्या मागे किती मेहनत असते ते दाखवलं आहे. व्हिडीओत जान्हवीनं लांब केसांचे एक्सटेंशन लावले आहेत. हेयर स्टायलिस्ट परफेक्ट लूकसाठी करण्यात येणारी वेणी घालताना दिसत आहेत. तर या फोटोशूटसाठी मेकअप करत असताना जान्हवी ही IV ड्रिप लावताना दिसली. 


IV ही (इंट्रावेनस थेरेपी) ड्रिप को रिवाइव इंडिया बनवतं. ही एका प्रकारची थेरेपी असते. जे की बॉडीला रिचार्ज करते. या थेरेपीला वेलनेस एक्सपीरियंसच्या नावानं देखील ओळखतात. ही एका प्रकारची मेडिकल टेकनीक आहे जी सेलिब्रिटीज घेतात. या थेरेपीनं स्किन ग्लोइंग होते आणि बॉडीला गरज असलेलं न्यूट्रिएंट्स मिळतात. IV ड्रिपच्या मदतीनं न्यूट्रिएंट्स सरळ बॉडीच्या नसांमध्ये जातात आणि शरीराची इम्युनिटीला वाढवतात. 


जान्हवी कपूरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर जान्हवी कपूर ज्युनियर NTR च्या आगामी चित्रपट 'देवरा' मुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातून जान्हवी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. 300 कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटात जान्हवी दिसणार आहे. या चित्रपटात लीड रोलमध्ये ज्युनियर एनटीआर दिसेल तर त्याच्या अभिनेत्रीच्या भूमिकेत जान्हवी दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कोराताल शिवा करणार आहेत. खरंतर सगळ्यात आधी या चित्रपटाचे नाव 'एनटीआर 30' होतं मात्र, त्यांतर त्याचं नाव बदलण्यात आलं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी बघते आई श्रीदेवीचे चित्रपट


जान्हवीनं खुलासा केला की तिनं याआधी कधीच आई श्रीदेवीचे चित्रपट पाहिले नाही किंवा तिचे डायलॉग्स कॉपी करण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, आता दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये एन्ट्री करणार आहे. तर श्रीदेवींचे जुने चित्रपट पाहते.