लग्नानंतर पहिल्यांदाच कतरिनाला सलमानची आठवण, नात्याबद्दल ही गोष्ट उघड
काही दिवसांपूर्वी कतरिना कैफने आणि अभिनेता विकी कौशल यांचे लग्न झाले, ज्यामुळे सलमानची प्रेम कहाणी अपूर्ण राहिली.
मुंबई : सलमान खानला बॉलिवूडच काय तर जगभरातील लोकं ओळखतात. त्याने बॉलिवूडमध्ये पैसा, सन्मान, प्रसिद्धी आणि नाव यासोबतच सर्व काही कमावले आहे. सलमान खानने आपल्या आयुष्यात अनेक बॉलीवूड अभिनेत्रींना डेट केले आहे. तसेत, त्याने अनेक अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये काम करण्याची देखील संधी दिली आहे आणि त्याची ही गोष्ट कोणापासूनही लपलेली नाही. त्यात सलमान खानचे दोन अभिनेत्रींसोबतच्या नात्याबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. त्याम्हणजे ऐश्वर्या राय आणि कतरिना कौफ. परंतु दोन्ही अभिनेत्रींसोबतचे त्याचे नाते फारसे टिकले नाही.
ज्यानंतर या दोन्ही अभिनेत्रींनी बॉलिवूडमधील दुसऱ्या अभिनेत्यासोबत लग्न करुन आपला संसार थाटला आहे.
काही दिवसांपूर्वी कतरिना कैफने आणि अभिनेता विकी कौशल यांचे लग्न झाले, ज्यामुळे सलमानची प्रेम कहाणी अपूर्ण राहिली. परंतु असे असले तरी, सलमान खान आणि कतरिना एकत्र काम करत आहेत.
अलीकडेच कतरिना कैफने लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सलमान खानबद्दल असे काही लिहिले आहे, ज्यावरून आजही दोघे एकमेकांच्या खूप जवळ असल्याचे दिसते.
कतरिनाने नुसतेच सलमानबद्दल सोशल मीडियावर लिहिले नाही, तर तिने त्याचा फोटो देखील आपल्या स्टोरीवर लावला आहे
सलमान खानचे बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक मोठे नाव आहे, ज्यामुळे संपूर्ण जग त्याचे फॅन आहे. सलमान खानबद्दल बोलायचे झाले तर, सध्याच्या काळात त्याच्याकडे कशाचीही कमी नाही, ज्यामुळे सलमान खानला आपले जीवन अतिशय आरामात आणि मजेत जगायला आवडते.
अलीकडे, 27 डिसेंबर रोजी कतरिना कैफने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर तिच्या स्टोरीमध्ये सलमान खानचा फोटो टाकला आणि सलमान खानला त्याच्या 56 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कतरिनाने जेवढ्या प्रेमाने सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तितक्याच प्रेमाने आजही कतरिनाच्या हृदयात सलमान खानसाठी नक्कीच जागा आहे असे दिसते आणि हे दोघं एकमेकांवरती किती प्रेम करतात आणि एकमेकांसाठी यांच्या मनात काय स्थान आहे हे देखील या वरुन दिसते.