Malaika Arora and Karishma Kapoor Daughter: मलायका अरोरा आपल्या फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिला कोणी बीट करेल असं काहीच नाही. बॉलिवूडमध्ये फॅशन स्टाईल आयकॉन कोण तर पहिलं नावं समोर येतं ते म्हणजे मलायका अरोराचं त्यामुळे ती कायमच यासाठी लक्षात राहते. तिच्या जिम लुकपासून ते तिच्या सगळ्या फॅशन लुकपर्यंत ती कायमच ओळखली जाते. जिमच्या बाहेर तर ती अनेकदा स्पॉट होताना दिसते त्यामुळे तिच्या फॅशनच्या चर्चा या कायमच रंगलेल्या असतात. अर्जून कपूर आणि मलायका अरोरा हे कायमच स्पॉट होताना दिसतात त्यामुळे अनेकदा त्यांच्या चर्चां या रंगताना दिसतात त्यामुळे मलायकाही अनेकदा चर्चेत असते काही दिवसांपुर्वी अर्जूनचा अर्धनग्न फोटो पोस्ट केल्यामुळे मलायका चर्चेत आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पुन्हा मलायकानं नवा कहर माजवला आहे. यावेळी चक्क तिनं करिश्मा कपूरच्या लेकीलाच कॉपी केलं आहे. त्यामुळे सध्या तिची बरीच चर्चा रंगताना दिसते आहे. तुम्हाला हे जाणून घेऊन कदाचित आश्चर्य वाटलं असेल परंतु हे खरं आहे. तुम्हाला माहितीये का मलायकाला फॅशनच्या बाबतीत तिचे चाहते तिला इतकं फॉलो करतात की तिची फॅशन ही एकदा कॉपी होताना दिसते परंतु आज काहीतरी उलटच झालं आहे. यावेळी चक्क मलायकानं आपल्यापेक्षा वयानं दुप्पटीनं लहान असणाऱ्या करिश्मा कपूरच्या लेकीचा लुकच कॉपी केल्याचे दिसते आहे. आता निव्वळ योगायोग आहे, ट्रेण्ड आहे की खरंच मलायकानं तिला कॉपी केलंय, परंतु याबाबत सगळीकडेच तूफान चर्चा या रंगल्या आहेत. 


मलायकाचा लुक


मलायका यावेळी आपल्या लेकासह डिनर डेटला स्पॉट झाली. तेव्हा तिनं लेस असलेल्या हातांचा ब्लॅक मिडी ड्रेस घातला होता. त्याचसोबत तिनं काळे सनग्लासेस लावले होते. यावेळी तिच्या लुकनं चाहत्यांना अक्षरक्ष: वेड लावलं होतं. त्यामुळे तिच्या या लुकची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे. यावेळी तिनं पांढऱ्या रंगाचे कॅनव्हास शुज घातले होते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगली. 



हा तिचा लुक मलायकानं कॉपी केल्याचा दिसतो आहे. तोच ड्रेस, कलर, व्हाईट शूट. मलायकाच्या आधी करिश्माची मुलगी समायरा स्पॉट झाली होती.