मुंबई : सोशल मीडियावरती प्रियांका आणि निक जोनसच्या घटस्फोटाच्या चर्चा आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत आहेत, परंतु या चर्चा का होत आहेत आणि या चर्चांची सुरूवात कुठून झाली असे अनेक प्रश्न नेटीझन्सना पडले आहेत. 1 डिसेंबर 2018 ला प्रियंका आणि निकचं लग्न झालं. लग्नानंतर प्रियंका परदेशातच स्थायिक झाली. तिने आपलं नावही सोशल मीडियावर प्रियंका चोप्रा-जोनस असं लावायला सुरूवात केली होती. मात्र अचानक इन्स्टा पेजवरून प्रियंकाने जोनस आडनाव हटवल्यामुळेच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.


नाव हटवणे आणि घटस्फोटाचा संबंध काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्याचदा अनेक सेलिब्रिटींच्या बाबतीत असं पाहिलं गेलं आहे की, सेलिब्रिटी आपल्या जोडीदारापासून वेगळं होण्यापूर्वी सोशल मीडियावरती स्वत:चं नाव बदलतात.


या पूर्वी मलायका अरोरा खाननेही पती अरबाज खानपासून घटस्फोट घेण्यापूर्वी तिच्या अकाउंटमधून खान हे आडनाव काढून टाकलं होतं. एवढच काय तर नुकतेच वेगळे झालेले साऊथचे कपल सामंथा आणि नागा चैतन्य यांच्या बाबतीत देखील असंच काहीसं घडलं. सामंथाने नागा चैतन्यपासून वेगळं होण्यापूर्वी सोशल मीडियावरुन आपलं आडनाव काढून टाकलं होतं. त्यामुळेच प्रियांकाने देखील तिचे नाव बदलल्यामुळे याचा संबंध थेट तिच्या घटस्फोटाशी लावला जात आहे.


परंतु प्रियांकाने यावर आपलं मत व्यक्त केलेलं नाही, पण तिच्या आईने मात्र याप्रकरणा संदर्भात खंत व्यक्त करत या बातम्या अफवा असल्याचं सांगितलं आहे.


प्रियांकाने आडनाव काढून टाकण्यामागील खरं कारण काय?


असं म्हटलं जात आहे की, निक जोनस (Nick Jonas) याने हल्लीच सोशल मीडयावर एक पोस्ट केली आहे. पोस्टच्या माध्यमातून तो एका शोबाबत माहिती देताना दिसत आहे.


हा शो Netflix वर आज, म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून प्रदर्शित होत आहे, याच शोमुळे प्रियांकाने आपलं नाव बदललं असल्याचं म्हटलं जात आहे.


निक आणि त्याच्या भावांची म्हणजेच जोनास ब्रदर्ससंबंधीत कोणतीही गोष्ट समोर येते, तेव्हा सर्वांच्या नजरा आपोआपच प्रियांकाकडे वळतात. 


लोकांना हे माहिती आहे की, प्रियांका पूर्वीपासूनच निकच्या सर्वाच शोला प्रमोट करत असते. कदाचित यासाठीच प्रियांकानं आपलं आडनाव हटवलं असू शकतं, ज्यामुळे ती आणि हा शो आणखी चर्चेत येईल.


परंतु यासंदर्भातील खरी माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रियांका आणि निकने देखील यावर काही वक्तव्य दिलेलं नाही.