`या` अभिनेत्रीच्या मागे हात धुवून लागला होता संजय दत्त, मग काय झालं? ज्येष्ठ अभिनेत्रीने सांगितलं!
Madhuri Dixit and Sanjay Dutt : माधुरी दीक्षित आणि संजय दत्त खरंच होते का रिलेशनशिपमध्ये? अभिनेत्रीच्या वक्तव्यानं एकच चर्चा
Madhuri Dixit and Sanjay Dutt : दिग्गज अभिनेत्री सुजाता मेहता या नेहमीच त्यांच्या अभिनयासाठी ओळखल्या जातात. त्यांनी आजवर 'प्रतिघाट' आणि 'यातीम'सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यावेळी चर्चेत असलेल्या माधुरी दीक्षित आणि संजय दत्त या दोघांच्या रिलेशनशिपवर त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 1980 मध्ये त्या दोघांचं नातं नेमकं कसं होतं याविषयी सांगितलं आहे.
हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत सुजाता यांनी त्या दोघांची खऱ्या आयुष्यात कशी केमिस्ट्री होती त्याविषयी सांगितलं. त्या दोघांमधील 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जमीन' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वाढली. संजय कधीच सेटवर आला नाही. त्यांचे इंटिमेट सीन, त्यातही पावसातील काही सीन्स त्यांचं नात किती जवळचं आहे हे दिसलं. त्या दोघांचे पावसातील सीन्सचे फोटो जिथे त्यांची केमिस्ट्री ही दाखवण्यात आली हे पाहिल्याचे सुजाता यांनी सांगितले.
त्या दोघांमधील रोमान्स हा यामुळ चर्चेचा विषय 'ठाणेदार' आणि 'साजन' सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांचाविषयीच्या अफवा आणखी वाढल्या. 1993 मध्ये झालेल्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात संजय दत्तला अटक केल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या. त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा देखील सुरु झाल्या होत्या. याच कारणामुळे त्या दोघांचं ब्रेकअप झालं का? या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया सुजाता यांनी दिली नाही. फक्त ते विभक्त झाले इतकं त्यांनी मान्य केलंय.
या इतक्या वर्षांनंतर माधुरीनं यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही की तिचं आणि संजय दत्तचं नेमकं नातं काय होतं. फक्त माधुरीच नाही तर तिच्याशिवाय संजय दत्तनं देखील कधीच या सगळ्यावर कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, ते दोघं अनेक वर्षांनंतर 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या कलंक या चित्रपटात एकत्र काम केलं.
त्याशिवाय त्यांनी अभिनेत्री श्रीदेवी आणि मिथून चक्रवर्ती यांच्या नात्यावर देखील वक्तव्य केलं. त्यांनी सांगितलं की श्रीदेवी आणि मिथून चक्रवर्ती यांचा जेव्हा ब्रेकअप झाला त्यानंतर त्या खूप शांत राहू लागल्या होत्या. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांचं तर लग्न देखील झालं होतं. पण कॅमेरा ऑन होताच त्या त्यांच्या कमेटिमेंटवर राहायच्या.