`आजाराची खिल्ली...` म्हणत Cervical Cancer ला झुंज देणारी अभिनेत्री पूनम पांडेवर भडकली
नुकतीच अभिनेत्रीच्या मृत्यूच्या अफेवमुळे सगळीकडेच चांगलीच खळबळ उडाली होती. तिच्या खोट्या मृत्यूच्या बातमीने सगळ्यांनाच चांगलाच धक्का बसला होता. मात्र स्वत: सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपण हे जनजागृती करण्यासाठी केलं असं ती म्हणाली.
मुंबई : अभिनेत्री हीबा नवाब आणि कृषाल आहूजाचा शो झनकमध्ये अभिनेत्री डॉली सोहीने दमदार भूमिका साकारली होती. आता समोर आलेल्या वृत्तानुसार काही दिवसांपुर्वी डॉली सोहीने शो सोडला आहे. मात्र यावेळी ही अभिनेत्री थोड्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
कॅन्सर पिडीत आहे डॉली सोही
डॉली सोही सर्वाइकल कॅन्सरला झुंज देत आहे. तिला गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये कॅन्सरबाबत समजलं. या कठिण वेळेत अभिनेत्री स्वत:ला खूप उत्तमप्रकारे संभाळत आहे. या सगळ्यानंतरही ती तिच्या कामावर खूप फोकस करत आहे. मात्र आता तिने हेल्थवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीचे किमोथेरपी सेशन सध्या सुरु आहेत. पिंकविलासोबत साधलेल्या संवादात डॉलीने सांगितलं की, डेलिसोपमध्ये काम करत राहण सध्या शक्य नाही.यासाठीच मी हा शो सोडण्याचा निर्णय घेतल्याचं अभिनेत्रीने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
कशी आहे डॉलीची तब्येत?
आपली कंडिशनबाबतीत सांगताना अभिनेत्री म्हणाली की, रेडिएशनमुळे मला खूप अशक्त वाटत आहे आणि यासाठीच मला काम करण्यास त्रास होत आहे. सोबतच ती असंह म्हणाली की, जेव्ही ती ठिक होईल आणि तिला खूप छान फिल होईल तेव्ही ती तिच्या कामावर नक्की परत परतेल.
तर दुसरीकडे पूनम पांडेच्या सर्वाइकल कॅन्सरच्या खोटी अफवा पसरवल्यामुळे डॉलीने आता रिएक्ट केलं आहे. तिने पुनवर राग व्यक्त केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना तिने सांगितलं की, मी यावेळी खूपच इमोशनल झाली आहे. पूनम पांडेसारख्या लोकांमुळे मी कोणत्याही वेळी रडू शकते. जिने सर्वाइकल कॅन्सरचा जोक बनवला आहे. हा पब्लिसिटी स्टंट किंवा कैंपेन हा चांगला पर्याय असू शकत नाही. जे लोकं या आजाराशी लढा देत आहेत आणि या वेदना सहन करत आहेत त्यांच्यासाठी ते पचवणं खूप कठीण आहे. पूनमच्या मृत्यूची बातमी कळताच मी हादरले होते.
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिने भाभी आणि कलश या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे. याचबरोबर तिने मेरी आशिकी तुमसे ही आणि खूप लडी मर्दानी, झासी वाली रानीमधून पुनरागम केलं होतं. याचबरोबर तिने देवो के देव महादेव, एक था राजा एक थी रानी सारखे शोदेखील केले आहेत. इनकमध्ये जर्नी सुरु करण्याआधी ती परिणीती सारख्या मालिकेत झळकली होती.