मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचे अंडरवर्ल्ड ड़ॉनशी प्रेमसंबंध होते. अशीच एक अभिनेत्री आहे जी सध्या बॉलिवूड विश्वापासून खूप दूर आहे. मात्र तिचे लेटेस्ट फोटो पाहालं तर ती आजही तितकीच बोल़्ड आणि ग्लॅंमरस दिसते. ही अभिनेत्री आहे तरी कोण ते जाणून घेऊयात.
 
चित्रपटांपेक्षा वादांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री मोनिका बेदीला कोणीही विसरू शकणार नाही. ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी मोनिका बेदी सध्या फिल्मी दुनियेपासून दूर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लेटेस्ट लुकची चर्चा 
बॉलिवूडपासून दूर गेलेली मोनिका सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान नुकतचं मोनिकाने आपला लेटेस्ट फोटो पोस्ट केला आहे. मोनिका बेदीचा लेटेस्ट फोटो पाहिल्यास, ही 47 वर्षीय अभिनेत्री सौंदर्याच्या बाबतीत अजूनही कुणापेक्षा कमी नाही, असा अंदाज 
येईल. 


मोनिकाच्या हॉटनेसचा अंदाज या फोटोंमधून सहज लावता येतो. एवढेच नाही तर मोनिका बेदी स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगा देखील करते. तिच्या या फोटोवर सध्या कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.  



फिल्म कारकीर्द 
बॉलीवूड अभिनेत्री मोनिका बेदीने 1995 मध्ये साऊथ चित्रपट 'ताजमहल'मधून अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 1995 मध्ये आलेल्या 'सुरक्षा' चित्रपटातून हिंदी सिनेविश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर 'प्यार इश्क और मोहब्बत' तसेच अभिनेता गोविंदा, संजय दत्तचा 'जोडी नंबर 1' या चित्रपटातून तिला अधिक ओळख मिळाली. 


 डॉन सोबत प्रेमसंबंध
 डॉन अबू सालेमसोबतच्या नात्यामुळे मोनिका बेदीचे बॉलिवूडमधील कनेक्शन जवळपास संपुष्टात आले. अबू सालेमशी असलेल्या संबंधांमुळे मोनिका बेदीलाही तुरुंगात जावे लागले होते. मात्र, त्यानंतर मोनिका बेदीने 'बिग बॉस 2' आणि 'झलक दिखला 2' सारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला.होता. मात्र त्यानंतर तिने सिनेमात पुन्हा प्रयत्न केलेचं नाहीत. बॉलिवूपासून ती दूर गेली होती.