मुंबई : दिग्दर्शक करण जोहरच्या 'दोस्ताना 2' चित्रपटातून अभिनेता कार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं समजत आहे. चित्रपटात कार्तिकसोबत अभिनेत्री जान्हवी कपूर झळकणार होती, पण आता कार्तिकच्या जागी अभिनेता राजकुमार राम किंवा विकी कौशलची वर्णी लागू शकते.  तर धर्मा प्रॉडक्शनने शुक्रवारी केलेल्या आधिकृत घोषणेत कार्तिकला चित्रपटातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर कंगनाने करण जोहरवर निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाने ट्विट करत करण जोहरला 'पापा जो' असं म्हटलं आहे. 'कार्तिक आर्यन स्वतःच्या मेहनतीवर इथंपर्यंत पोहोचला आहे. तो पुढेही असचं करेल. वडील जो आणि त्यांची नेपो गँग क्लबला विनंती आहे. कार्तिकला एकट्याला सोडा. कार्तिकच्या मागे लागू नका नाहीतर तो सुशांतसारखा फासावर लटकण्यासाठी लाचार होईल.'



'गिधाड्यांनो त्याला एकट्याला सोडा...' असं ट्विट करत कंगनाने कार्तिकचं समर्थन केलं असून करण जोहर आणि बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका करत निशाणा साधला आहे.  बॉलिवूडमधील सध्याची परिस्थिती पाहाता सोशल मीडियावर पुन्हा करणला ट्रोल केलं जात आहे. शिवाय त्यांच्यावर संतापही व्यक्त केला जात आहे. 


दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजीची चर्चा सर्वत्र होत आहे. कलाकारांचं कौशल्य बघून त्यांना संधी द्या. घराणेशाही बघून बॉलिवूडमध्ये कोणाला एन्ट्री देवू नका. अशा चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या.