नवी दिल्ली : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने हॉलीवूडमध्ये देखील आपला ठसा उमटवला आहे. तिचे हजारो-लाखो फॅन्स आहेत.


का चेक करत नाही मेल ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांसाठी ती प्रेरणादायी आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी लोक झुरतात. इतकंच नाही तर आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहचवण्यासाठी फॅन्स तिला मेल, मेसेज करतात. तिला मेल, मेसेज केल्यावर ती ते वाचत असेल किंवा वाचून त्यावर रिप्लाय करेल, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण अनेकांची तक्रार आहे की, ती आपले ईमेल्स चेक करत नाही. तिच्याकडे इतका वेळ नसतो की, ती मेल चेक करेल.



कोणी उलघडली ही बाब ?


या गोष्टीचा खुलासा क्वांटिकोचे अॅक्टर एलन पावेलने केला. एलनने सोशल मीडियावर प्रियंकाचा फोटो शेअर केली आहे. ज्यात प्रियंकाच्या मोबाईलमधील २,५७,६२३ अनरीड ईमेल्स दिसत आहेत. त्या पोस्टमध्ये एलनने लिहिले आहे की, प्रियंका चोप्राला मेल पाठवू नका, ती कधी ते वाचत नाही. त्यावर खूप रिट्वीटस आले आहेत.