मुंबई : करण जोहर कोणत्याही कारणाने चर्चेत येतो. गेल्यावर्षी करण जोहर या गोष्टीमुळे चर्चेत होता की त्याने कार्तिक आर्यनला आपला सिनेमा 'दोस्ताना 2' (Dostana 2) मधून बाहेर काढलं होतं.  या घटनेनंतर सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. प्रत्येक जण करण जोहरवर पुन्हा एकदा नेपोटिझम (Nepotism) चा आरोप करू लागले. त्यामुळे करण जोहरने नेपोटिझमच्या या वादातून वाचण्यासाठी एक वेगळा मार्ग निवडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिकला 'दोस्ताना 2' सिनेमातून करण जोहरने लांब केलं. एवढंच नव्हे तर त्याच्या जागी अक्षय कुमार, राजकुमार राव, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि सिद्धांत चतुर्वेदी सारख्या कलाकारांचा विचार केला. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, या सिनेमाच्या कास्टिंगबाबत करणने आपल्या क्रिएटिव टीम आणि दिग्दर्शकांसोबत मीटिंग्स घेतली. या दरम्यान अनेक नाव जोडली गेली मात्र करण जोहर अक्षय कुमारला घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू लागले. तसेच करण जोहरने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 




नेपोटिझमपासून करण जोहरला लांब राहायचंय 


असं म्हटलं जातं की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात करण जोहरवर वेगवेगळे आरोप करण्यात आले. त्यामुळे आता करण जोहर कोणतीच रिस्क घेण्याच्या मनस्थितीत नाही. या सिनेमात अक्षय कुमारसोबत आणखी एक बाहेरचा कलाकार घेण्याचा विचार आहे. ज्याच्यामुळे तो नेपोटिझमच्या वादापासून दूर राहेल. या सिनेमाकरता 5 नावांच शॉर्टलिस्ट केलं आहे. ज्यामधील 4 जण बाहेरचे आहेत.  


ही आहे सिनेमाची स्टोरी 


सध्या सिनेमाचं चित्रिकरण थांबल आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यावरच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. सिनेमात जान्हवी कपूर आणि डेब्यूटेंट लक्ष्य लीड रोलमध्ये असणार आहेत.