मुंबई : सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी त्यांच्या आगामी 'डबल एक्सएल' चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. नावाप्रमाणेच हा चित्रपट वाढत्या वजनाशी झगडणाऱ्या दोन महिलांची कथा सांगणारा आहे. आजच्या काळातील महिलांच्या सौंदर्याचा दर्जा मोडीत काढत सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी या चित्रपटात प्लस साइज महिलांच्या भूमिकेत आहेत. यासोबतच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच चाहते त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा चित्रपट बॉडी शेमिंगचा मुद्दा मांडतो
'डबल एक्सएल'च्या ट्रेलरवरून हे स्पष्ट झालं आहे की, हुमा कुरेशी या चित्रपटात 'राजश्री'ची भूमिका साकारत आहे. तर तिकडे सोनाक्षी सिन्हा 'झोया'च्या भूमिकेत दिसणार आहे. प्लस साइज महिलांना बॉडी शेमिंगला कितपत बळी पडावं लागतं ते या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मात्र, ही गंभीर बाब अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, जेणेकरून लोकांना हे प्रकरण हसतखेळत समजेल.



अशा प्रतिक्रिया ट्रेलरला मिळत आहेत
सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी जगातील महिलांसोबत बॉडी शेमिंगबद्दल बोलताना दिसत आहेत. पाहिलं तर बॉडी शेमिंग ही अशी समस्या आहे, ज्याचा त्रास प्रत्येक स्त्रीला कधी ना कधी सहन करावा लागतो. जास्त बारीकपणामुळे असो किंवा लठ्ठपणामुळे, याचा त्रास सहन प्रत्येकाला सहन करावा लागतो. त्याचबरोबर,  ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.