मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा यात डॉ. हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांचे सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कवी कुमार अगदी दिलखुलास व्यक्ती होते आणि त्यांना खाण्याची खूप आवड होती. डॉ. हाथी यांच्या निधनाने टेलिव्हिजन सृष्टीवर दुःखाची छाया पसरली आहे. तर तारक मेहताचे शूटिंग स्थगित करण्यात आले आहे. यादरम्यान डॉ. हाथी यांचे एक ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सर्जरी करुन ८० किलो वजन कमी केले होते. यामुळे त्यांना चालता-फिरताना त्रास होत असे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कवी कुमार यांनी एक फोटो शेअर करत लिहिले होते की, कोणीतरी म्हटलंय, कल हो ना हो, मी म्हणतो की, पल हो ना हो, म्हणून प्रत्येक क्षण जगा. यावरुन ते प्रत्येक क्षण जगू इच्छित होते, हे समजतंय.




कवी कुमार यांचा प्रवास


आपल्या अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिहारहून मुंबई आलेल्या कवी कुमार यांना पैशाअभावी मुंबईच्या रस्त्यांवरही राहावे लागले होते. डॉ. हाथी यांना अभिनयाशिवाय कविता करण्याचीही आवड होती. कवी कुमार यांनी २००० मध्ये 'मेला' सिनेमात काम केले होते. त्यानंतर तब्बल १० वर्ष ते तारक मेहता या लोकप्रिय मालिकेत काम करत होते.


यावर द्याबेन म्हणतात...


त्यांच्या निधनानंतर द्याबेन म्हणजे दिशा वकानी म्हणाल्या की, आमचा तर विश्वासच बसत नाही की ते आमच्यात नाहीत. माणूस म्हणून ते खूप चांगले होते. खाणे आणि खिलवणे त्यांना आवडायचे. माझ्या प्रेग्नेंसीमध्ये ते माझ्यासाठी गुलाबजाम घेऊन येत असतं.