टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली दृष्टी धामी गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. एक दिवसापूर्वी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती की, प्रेग्नन्सीचे 41 आठवडे उलटून गेले आहेत आणि अजूनही तिला बाळ झालेलं नाही. पण आता दृष्टीबद्दल एक आनंदाची बातमी येत आहे, कारण दीर्घ प्रतीक्षेनंतर या टीव्ही अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना दृष्टी धामीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ती आली आहे. 22 ऑक्टोबर 2024. स्वर्गातून थेट आपल्या हृदयात. एक नवीन जीवन. एक नवीन सुरुवात.



41आठवड्यांनी झाली आई 



यापूर्वी, दृष्टी धामीने एक मजेदार पोस्ट शेअर केली होती की 41 आठवडे झाले आहेत आणि बाळ अद्याप बाहेर आलेले नाही. आता तर तिची चिडचिडही झाली आहे. याच पोस्टवर राहुल वैद्यची पत्नी दिशाने सांगितले की, त्यांच्या बाळाला इतकी घाई होती की ते 37 व्या आठवड्यातच बाहेर आले.


शुभेच्छांचा वर्षाव 


दृष्टी धामीच्या पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहते अभिनंदन करत आहेत. तिची मैत्रिण सनाया इराणीने लिहिले, 'माझी मुलगी आली आहे.' शक्ती अरोरा यांनी अभिनंदन केले. जेनिफर विंगेट, रुबिना दिलीक, नकुल मेहता, करण ग्रोव्हर, दिशा परमार, आदिती गुप्ता, पूजा गौर, सुमोना चक्रवर्ती, मौनी रॉय, सुरभी ज्योती, किश्वर मर्चंट यांच्यासह अनेक चाहत्यांनीही या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.


लग्नानंतर 9 वर्षांनी झाली आई 


10 जानेवारी 1985 रोजी मुंबईत जन्मलेली दृष्टी ही नृत्य प्रशिक्षक होती. त्यानंतर मॉडेलिंगपासून करिअरला सुरुवात केली. तिने 'दिल मिल गए', 'गीत', 'मधुबाला', 'एक था राजा एक थी रानी' आणि 'सिलसिला बदलते रिश्तों का' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. दृष्टी 'झलक दिखला जा 6' हा डान्स शोची विजेती आहे. 'द एम्पायर' या वेबसिरीजमध्ये दिसली आहे. तिने 21 फेब्रुवारी 2015 रोजी बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्न केले. लग्नाच्या 9 वर्षानंतर ती आई झाली.