Drishyam Box Office Collection: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती दृश्यम 2 (Drishyam 2) या चित्रपटाची. या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना पुष्कळ दिवस लागून राहिली होती. अखेर हा चित्रपट (Drishyam 2 Movie) आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आणि या चित्रपटानं काही दिवसांतच कोट्यावधींची (crores) कमाई केली आहे. सध्या हा पिक्चर बॉक्स ऑफिसवरही (Box office) चांगलाच हीट ठरला आहे. या चित्रपटाच्या सोबतीला काहीच दिवसांनी दृश्यम 2 सोबत भेडिया (bhediya) हा चित्रपटही रिलिज झाला आहे. त्यामुळे सध्या बॉलीवूड - बॉलीवूड चित्रपटांमध्ये मोठीच चुरस झालेली पाहायला मिळते आहे. अनेकदा बॉलीवूडमध्ये असेही पाहिले जाते की बिग बजेट चित्रपटही मोठ्या पडद्यावर बाजी मारतात. परंतु दृश्यमसारखे (box office collection drishyam 2) सिनेमेही म्हणजेच लो बजेट सिनेमेही बॉक्स ऑफिसवर हीट ठरला आहे. बिग बजेट, स्टारकास्टपेक्षा आता प्रेक्षकांना चांगली कथा महत्त्वाची ठरते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वीकेंडला चित्रपट पाहणाऱ्यांची पहिली पसंती दृश्यम 2 आणि दुसरी पसंती भेडिया आहे. परंतु त्यात दृश्यम 2 (drishyam 2) ला प्रेक्षकांची चांगली पसंती असल्याची माहिती कळते आहे. त्याचबरोबर आता अजय देवगणचा काळ सुरू झाला आहे, सध्या अजय देवगणचे सर्वच चित्रपटही हीट ठरत आहेत. 'दृश्यम 2'चा देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरील (drishyam 2 box office) दुसरा शनिवारही चांगलाच ठरला. दुसऱ्या शुक्रवारपासून कलेक्शन जवळपास दुप्पट झाले आहे. म्हणजेच प्रेक्षकांना दृश्यम 2 खूप आवडला आहे. दुसऱ्या रविवारची कमाई 18 ते 20 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते असे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण आठवड्यात अजय देवगणने पडद्यावर वर्चस्व गाजवले आहे. 


हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना


बॉक्स ऑफिसवर कमाई


दृष्यम 2 ची सुरुवात 15 कोटी रुपयांपासून झाली. चित्रपटाने जोर धरला आणि अवघ्या 7 दिवसांत चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा गाठला. दुसऱ्या शुक्रवारी 7.75 कोटींनंतर दुसऱ्या शनिवारी 14 कोटींची कमाई झाली. चित्रपटाची 9 दिवसांची एकूण कमाई 125 कोटी रुपये आहे. 


लोकप्रिय चित्रपट कोणता?


भेडियाच्या (bhediya) मुळे दृष्यम 2 चा व्यवसायही विभागला गेला आहे. आम्ही तुम्हाला सांगूया की या वीकेंडमध्ये दृष्यम 2 अजूनही भारतीय लोकांची पहिली पसंती आहे. दृश्यम 2 च्या नेट बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या आठवड्यात 103.50 कोटी रुपये, दुसऱ्या शुक्रवारी 7.75 कोटी रुपये आणि दुसऱ्या शनिवारी 14 कोटी रुपये कमावले आहेत.