मुंबई : अभिनेत्री इशिता दत्त लवकरच फिरंगी या आगामी सिनेमात कपिल शर्मासह दिसणार आहे. ऑनस्क्रीन अजय देवगणची मुलगी असलेल्या इशिताने आज आपल्या बॉयफ्रेंडसह गुपचूप लग्न केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या जुहू येथील इस्कॉन टेम्पलमध्ये इशिताने बॉयफ्रेंड आणि अभिनेता वत्सल शेठ याच्याशी लग्नगाठ बांधली. हिंदू धर्मातील रितीरिवाजानुसार यांनी लग्न केले. या सोहळ्यासाठी फार निवडक लोक उपस्थित होते. 


इशिता आणि वत्सल यां दोघांचे कुटुंबिय, तसेच त्यांचा मित्रपरिवार यावेळी सोहळ्याला उपस्थित होते. वत्सल शेठ हा अभिनेता टारझन द वंडर कार या सिनेमात काम केले होते. 



दृश्यमध्ये अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती


इशिताने २०१२मध्ये आलेल्या दृश्यम या सिनेमात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती. झारखंडच्या जमशेदपूर येथील इशिताने यापूर्वी दाक्षिणात्य सिनेमातही काम केलेय. 


तनुश्री दत्ताची लहान बहीण आहे इशिता


इशिता दत्ता ही तनुश्री दत्ताची लहान बहीण आहे. इशिताने जमशेदपूरच्या डीबीएम स्कूलमधून शिक्षण घेतलेय. त्यानंतर पुढील शिक्षण तिने मुंबईत केले. इशिताला अभिनयाशिवाय ट्रॅव्हलिंग आणि कुकिंगची आवड आहे. याशिवाय तिला वाचनाचीही आवड आहे.