मुंबई : ड्रग्ज प्रकरणातून काही दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आलेल्या अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरूख खानचा मूलगा आर्यन खानने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.त्यामुळे आर्यनची पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये आर्यनने एका सिनेमाचे पोस्टर शेअर केले असून स्टारकास्टला शुभेच्छा दिल्या.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरूख खानची मुलगी सुहाना खानने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. सुहाना खान 'द आर्चिज' चित्रपटातून डेब्यू करणार आहे. या संदर्भात चित्रपट निर्मात्या झोया अख्तर आणि नेटफ्लिक्सने 'द आर्चीज' चित्रपटाची घोषणा केली. 
यासोबतच या चित्रपटातून एक नव्हे तर तीन स्टार किड्स डेब्यू करणार असल्याचे सांगितले. सुहाना खान व्यतिरिक्त यात बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील आहे.


आर्यन खान जेलमधून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये बहीण सुहाना खानच्या या डेब्यु फिल्मचे पोस्टर आर्यन खाने इन्टाग्रामवर शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या. बेस्ट ऑफ लक बेबी सिस्टर, टीझर खुप चांगला आहे. सर्वच कलाकार चांगले दिसतायत, अशा आशयाचे पोस्ट त्याने केली आहे.  


अटक आणि जामीन झाल्यानंतर आर्यन खान सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हता. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने एक महिना न्यायालयीन कोठडीत काढला, त्यानंतर त्याला जामीन मिळाला.दर शुक्रवारी त्यांना NCB कार्यालयात हजेरी लावण्यासाठी जावे लागे. या संपूर्ण प्रकरणात आर्यन खान खूप ट्रोल झाला होता.