मुंबई : आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असणाऱ्या सुनावणीमध्ये माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यनच्या वतीने युक्तिवाद मांडला. यावेळी त्यांनी सदर प्रकरणासाठी आर्यन नेमका जबाबदार कसा हा प्रश्न उपस्थित केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युक्तीवादात नेमकं काय घडलं? 


मुकुल रोहतगी यांनी आर्यन आणि अरबाज यांना क्रुजवरील पार्टीला गेस्ट म्हणून बोलावले होते, दोघे (आर्यन आणि अरबाज) cruise जवळ गेले, पण आर्यनकडे काहीही मिळाले नाही, त्याची मेडिकलही केली गेली नाही, असं ते म्हणाले. 


आर्यनला अटक करण्याचे काहीही कारण नव्हते असा दावा करत आर्यनने ड्रग्सचे सेवनही केले नव्हते हे त्यांनी स्पष्ट केले. आर्यनच्या मित्राकडे 6 ग्रॅम चरस सापडले तर याला आर्यन कसा जबाबदार असा प्रश्न रोहतगी यांनी उपस्थित केला. 


आर्यनचे स्टेटमेंट घेतले गेले, मात्र ज्या पद्धतीने स्टेटमेंट घेतले गेले ते ग्राह्य धरता येणार नाही, अशी उदाहरणे sc समोरील सुनावणीत देण्यात आली आहेत. हा ट्रॅप आहे, असे म्हणत आर्यन शिपवर चढलाही नाही, ड्रग्स जवळ बाळगले नाही, सेवन केले नाही तर या प्रकरणी त्याला टार्गेट केले गेले असे रोहतगी यांनी न्यायालयात स्पष्ट केले. 


केवळ 6 ग्रॅम चरस जवळ बाळगण्यासाठी जेलमध्ये टाकणे योग्य नाही असे म्हणत. आर्यनवर 27(A) कलम लावण्यात आलेले नाही. Ncbच्या मते हे षडयंत्र असल्यास आर्यनवर कलम का लावला गेला नाही, असा युक्तिवाद रोहतगी यांनी केला.