नवी दिल्ली : कॉमेडीयन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Haarsh Limbachiyaa) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. नारकोटीक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने अटक केल्यानंतर रविवारी त्यांना मुंबईतील किल्ला कोर्टात (Kila Court) सादर करण्यात आलं.  ड्रग्ज प्रकरणी सुनावणीनंतर दोघांना ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारती सिंगला कल्याणच्या तुरुंगात नेण्यात आलं तर हर्ष लिम्बाचियाला तळोजा कारागृहात केले जाणार आहे. ड्रग्ज केस असल्यामुळे जामिन याचिका किल्ला कोर्टात दाखल करावी लागणार आहे. तोपर्यंत दोघांना काही काळ तुरुंगात राहावे लागेल. सोमवारी किल्ला कोर्टात दोघांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. यानंतर दोघांना दिलासा मिळणार की नाही ? हे स्पष्ट होणार आहे. 


कॉमेडीयन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Harsh Limbachiyaa) ला कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवलंय. भारती आणि हर्ष यांच्यावर ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप आहे.  मुंबईच्या (Mumbai) किल्ला कोर्टात भारती सिंग (Bharti Singh) आणि हर्ष लिम्बाचिया  (Harsh Limbachiyaa) यांना सादर करण्यात आलं. भारती आणि हर्ष यांच्यावर गांजा सेवनाचा आरोप आहे. या दोघांना एनडीपीएस (NDPS) एक्टच्या कलम २७ अंतर्गत अटक करण्यात आलीय. 



कॉमेडियन भारती सिंगचा पती हर्षला देखील एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. . ड्रग्जच्या पेडलर्सकडून गुप्त माहिती मिळाल्यानंतर टीव्ही अभिनेत्री आणि कॉमेडियनच्या भारती सिंहच्या घरी एनसीबीने धाड टाकली होती. 


एनसीबी त्यांचा घरात आणि कार्यालयात धाड टाकल्यानंतर ८६.५ ग्रॉम ड्रग्स जप्त करण्यात आला आहे. शिवाय गांजाचे सेवन करत असल्याची कबुली दोघांनी दिली आहे. 


दरम्यान, ड्रग्स प्रकरणी याआधी सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर निर्माता फिरोझ नाडियादवालाची पत्नी शबाना यांना देखील अटक करण्यात आली होती. तर याप्रकरणी अनेकांचे जबाब देखील नोंदवले गेले आहेत.