कॉन्सर्टमध्ये Shah Rukh Khan च्या गाण्यावर थिरकली Dua Lipa; सुहानानं शेअर केला खास VIDEO
Dua Lipa Dance on Shahrukh Khan Dance at Concert : सुहानानं शेअर केला दुआ लीपाच्या कॉन्सर्टमधील खास व्हिडीओ...
Dua Lipa Dance on Shahrukh Khan Dance at Concert : ग्रॅमी पुरस्कार विजेती गायिका दुआ लीपा काल 30 नोव्हेंबर रोजी भारतात तिच्या कॉन्सर्टसाठी पोहोचली होती. दुआ लीपाच्या कॉन्सर्टला तिच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. दुआ लीपानं या कॉन्सर्टमध्ये तिची अनेक गाजलेली गाणी गायली. पण सगळ्यात जास्त मोठा आश्चर्याचा धक्का तिच्या चाहत्यांना तेव्हा लागला जेव्हा 'लॅविटेटिंग' आणि शाहरुख खानचं 'वो लडकी जो सबसे अलग है' या गाण्यावर तिनं परफॉर्म केलं. दरम्यान, शाहरुखची लाडकी लेक सुहाना खाननं देखील त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काल दुआ लीपाचा मुंबईमध्ये कॉन्सर्ट होता. तिच्या या कॉन्सर्टची घोषणा अनेक महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. जेव्हा दुआ लीपानं 'लॅविटेटिंग' हे गाणं गायला सुरुवात केली कोणालाही अपेक्षा नव्हती की मध्येच 'वो लडकी जो सबसे अलग है' हे गाणं सुरु होईल आणि त्यावर दुआ लीपा थिरकताना दिसेल. दरम्यान, तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दुआनं तिच्या कॉन्सर्टमध्ये मॅशअप केल्यानं त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या गाण्यावर दुआनं डान्स देखील केला. त्यामुळे हे क्रॉसओव्हर हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
सुहानानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कॉन्सर्टमधला एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यावर तिनं रिअॅक्टही केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत सुहानानं कॅप्शनमध्ये डोळ्यात हार्ट असणारं इमोटीकॉन, उत्साही आणि डान्स करतानाचे इमोटीकॉन शेअर केले आहेत. दरम्यान, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'हे खूप जास्त आवडलं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तिनं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अखेर ज्याची अपेक्षा केली नव्हती ते झालं आणि महत्त्वाचं म्हणजे तिनं केलं.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'अशा प्रकारे तुम्ही एक ट्रेंड होता.'
हेही वाचा : तुम्ही नुसतं ट्रोल करत बसा! उर्फी एक ड्रेस विकून होते कोट्यधीश
दुआ लीपाचा हा कॉन्सर्ट बीकेसीमध्ये होता. यावेळी तिच्या कॉन्सर्टमध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात अनंत अंबानी त्याची पत्नी राधिका मर्चेंट आणि ईशा अंबानी आणि तिचा नवरा आनंद पीरामल देखील सहभागी झाले होते. दुआ लीपाचा भारतात हा दुसरा कॉन्सर्ट आहे. तिचा पहिला कॉन्सर्ट हा 2019 मध्ये मुंबईमध्ये वनप्लस म्यूजिक फेस्टिवल दरम्यान, झाला होता. यंदाच्या वर्षाची सुरुवात दुआ लीपानं भारतात केली होती. 2023 च्या शेवटी ती राजस्थानमध्ये आली होती आणि तिनं न्यू ईयरची सुरुवात इथे झाली.