मुंबई : सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत पाहायला मिळत आहे. चीनमध्ये फैलाव झालेल्या कोरोना व्हायरसमुळे जगात हाहाकार माजला आहे. या जीवघेण्या व्हायरसमुळे बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी देखील होळी साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. संपर्कातून करोनाची लागण होण्याचा धोका वाढत असल्यामुळे लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील धुळवड साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे २९ रुग्ण आढळले आहे. परंतु महाराष्ट्रात आतापर्यंत करोनाचा एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कलाकारांनी हा महत्त्वपूर्व निर्णय घेतला आहे. 


त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्वसामान्यांनी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रूमाल वापरण्याचे आवाहन  विधान परिषदेच्या माध्यमातून राज्यातील जनतेस केले आहे. धक्कादायक म्हणजे आता पर्यंत संपूर्ण जगात एकूण ९०८३९ नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर ३११० नागरिकांचा कोरोना व्हायरसने बळी घेतला आहे.